घरठाणेठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या महत्त्वाच्या तरतूदी

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या महत्त्वाच्या तरतूदी

Subscribe

महत्वाच्या बाबींसाठी केलेल्या तरतूदी 

ठाणे महानगरपालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. ठाणेकरांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी कंबर कसली आहे. या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्टय हे आहे की, कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला हा वास्तववादी व काटकसरीचा अर्थसंकल्प आहे.

कोरोना या महाभयंकर विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जागतिक स्तरावर महामारी घोषित करण्यात आली. या विषाणुच्या भयंकर प्रादुर्भावामुळे व त्यावरील उपाय योजनेचा भाग म्हणून देशपातळीवर लॉकडाऊन लागू करावा लागला. त्याचा परिणाम सर्व उदयोगधंदे, व्यवसाय व रोजगारावर झाल्यामुळे महापालिकेसही अपेक्षित असलेले कर, दर व शुल्कापोटी महसुल प्राप्त झाला नाही. परिणामी महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली. हा अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष प्राप्त होणा-या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्याने विचार विनिमय करुनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. सन २०२१-२२ २७५५ कोटी ३२ लक्ष रकमेचे मूळ अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे.

- Advertisement -

सन २०२१-२२ मध्ये महसूली खर्चासाठी रु. १८१९ कोटी ६१ लक्ष तरतूद करण्यात आली असून भांडवली खर्चासाठी रु.९३५ कोटी लक्ष तरतूद प्रस्तावित आहे. ३७ महसुली खर्चामध्ये वेतन व भत्त्यावरील तरतूद रु.९०२ कोटी ६६ लक्ष तरतूद प्रस्तावित असून यामध्ये ७ व्या वेतन आयोगापोटी रु.७५ कोटी तरतुदीचा समावेश आहे. तसेच महसुली खर्चामध्ये आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन व शिक्षण विभागासाठी पुरेशा तरतुदी प्रस्तावित आहे. परिवहन सेवेसाठी महसुली व भांडवली मिळून रु. १२२ कोटी ५० लक्ष तरतूद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बाबींसाठी केलेल्या तरतूदी 

१) पाणी पुरवठा : पाणी पुरवठा विभागात भांडवली कामांसाठी रु ११४ कोटी २९ लक्ष तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

२) मलनिःसारण या विभागासाठी रु.७२ कोटी ५० लक्ष तरतूद करण्यात आली असून प्रकल्पांतर्गत भुयारी गटार योजना व अमृत योजनेसाठी रु. ५० कोटी ६९ लक्षची तरतूद प्रस्तावित आहे.

३) पूल प्रकल्प : पूल प्रकल्पांसाठी एकूण रु.४८ कोटी १७ लक्ष तरतूद प्रस्तावित आहे.

४) रस्ते विकसन रस्ते विकसनासाठी विविध लेखाशीर्षांतर्गत रु. २४० कोटी २५ लक्ष तरतूद प्रस्तावित आहे.

५) रस्त्यावरील दिवाबत्ती या विभागांतर्गत रु. ३६ कोटी ३३ लक्ष तरतूद भांडवली कामांसाठी सन २०२०-२१ मध्ये प्रस्तावित आहे.

६) आरोग्य सुविधा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व इतर रुग्णालयांमधील उपकरणे व इतर कामांसाठी रू. २७ कोटी १० लक्ष तरतूद करण्यात आली आहे. कोरोना आरोग्य संकाटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आरोग्य विभासाठी ४,७२८ कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले आहे.

७) घनकचरा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापनासाठी रु.२९ कोटी २० लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

सन २०२०-२१ मध्ये महसुली खर्चासाठी रु.१९३१ कोटी ४९ लक्ष खर्चाचे अंदाज प्रस्तावित होते. सुधारित अंदाजपत्रकात रु.१८२ कोटी ३८ लक्ष खर्चात कपात करुन ते रु.१७४९ कोटी ११ लक्ष करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन वेळीच केलेल्या उपाय योजनांवर आतापर्यंत प्रत्यक्ष खर्च रु. ८१ कोटी १५ लक्ष झाला आहे. कोरोना नियंत्रणासाठी वेळीच निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे इतर खर्चावर नियंत्रण आणले आहे. भांडवली खर्चासाठी रु.२१५४ कोटी ०२ लक्ष तरतूद प्रस्तावित होती त्यात जवळपास ४९ % कपात करुन ती रु. १०५७ कोटी ३६ लक्ष करण्यात आली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -