घरठाणेठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदली का?

ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदली का?

Subscribe

ठाण्यात चर्चेला सुरुवात

ठाणे । ठाणे महानरपालिकेचे आयुक्त म्हणून अभिजित बांगर यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी कारभार सांभाळायला सुरुवात केली होती. त्यांची लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक बदली झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. मुंबई येथील बृहमुंबई महनगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून अभिजित बांगर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे महानरपालिकेचा कारभार सांभाळताना त्यांनी स्वच्छता आणि अनधिकृत बांधकामावर नजर ठेऊन स्वच्छ ठाणे आणि सुंदर ठाणे संकल्पना राबवली आणि अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला होता.
ठाणे महानगरपालिका आयुक्त म्हणून अभिजित बांगर यांनी सप्टेंबर 2022 रोजी जबाबदारी सांभाळली, यानंतर कामगारांचे प्रश्न असो, झोपडपट्टी पुनर्वसन असो किंवा रस्ते, विकासकामे असोत त्यांनी ठाणे पालिकेचे नाव राज्यात मोठे केले. स्वच्छ ठाणे आणि सुंदर ठाणे या संकल्पनेमुळे राज्यात ठाणे महापालिकेचे नाव काढले जाते. यामुळे ठाणे महानगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

दिवा, कळवा आणि मुंब्रा या प्रभागात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असल्याने आयुक्तांनी अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई केली. यामध्ये जे नवीन अनधिकृत बांधकाम झाले, त्या बांधकामाला पाणी कनेक्शन ज्या अधिकार्‍यांनी मंजुरीने दिले गेले त्या अधिकार्‍यावर देखील आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. तसेच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम देखील त्यांनी केले. पण राजकारणामुळे काही ठिकाणीच अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली. पण ठाणे महनगरपालिका सांभाळत असताना एक चांगला अधिकारी म्हणून आयुक्त अभिजित बांगर यांनी संपूर्ण जबाबदारीने काम पाहिले. विशेष करून मुख्यमंत्र्यांचे ठाणे असल्याने ठाण्याकडे आयुक्तांनी विशेष लक्ष देऊन ठाणे महापालिकाचे उत्पन्न वाढीकरता अनेक प्रकल्प आयुक्तांनी ठाण्यात राबवले. आयुक्त अभिजित बांगर यांची मुंबई येथील बृहमुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली असल्याने अचानक निवडणुकीच्या तोंडावर का बदली झाली ? असा प्रश्न ठाणेकर नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -