घरठाणे  गेल्या ४८ तासात ठाणे शहरात २४२.९९ मिमी पावसाची नोंद

  गेल्या ४८ तासात ठाणे शहरात २४२.९९ मिमी पावसाची नोंद

Subscribe

शहरात पावसाची विश्रांती

हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट  जाहीर केले असताना, ठाणे शहरात बुधवारी पाऊस ये-जा करत हजेरी लावत होता.  गेल्या ४८ तासात ठाणे शहरात २४२.९९ मिमी पावसाची नोंद झाली असून बुधवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २०.८० मिमी पाऊस झाला होता. वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटलचा स्लॅब पडून एक वयोवृद्ध आजीबाई जखमी झाल्या आहेत. तसेच मुंब्रा बायपास रोडवर पुन्हा एकदा दरड कोसळली. त्यातच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी वाहतुकीची वाट अडवली होती. त्याचबरोबर गेल्या चोवीस तासात शहरभर १९ झाडे कोसळली आहेत.
 सोमवार आणि मंगळवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. सोमवारी १४६.०२ मिमी तर मंगळवारी ९६.९७ मिमी पाऊण बरसला आहे. या दोन दिवसात झालेल्या २४२.९९ मिमी झाला तरी गतवर्षाच्या तुलनेत यंदा कमीच पाऊस झाला आहे. त्यातच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केल्याने जोरदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र बुधवारी पाऊस अधूनमधून हजेरी लावून जाताना दिसत होता. त्यामुळे दुपारपर्यंत २०.८० इतका पाऊस झाला होता.
 खड्ड्यांनी अडवली वाहतुकीची वाट
मुंबई-नाशिक महामार्गावर बुधवारी दुपारी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहण्यास मिळाल्या, या रांगा विवियाना मॉल पर्यंत आल्या होता. त्यामुळे या फटका अंतर्गत रस्त्यांवर ही दिसून आला. ही कोंडी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे झाली असून वाहतुकीचा वेग त्यामुळे मंदावल्याचे बोलले जात होते.
 चोवीस तासात तक्रारींचा पाऊस
गेल्या चोवीस तासात शहरात तक्रारींचा पाऊस पडला. तब्बल ४४ तक्रारींमध्ये १९ तक्रारी झाडे कोसळल्याच्या प्राप्त झाल्या आहेत. एक ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली असून एक इमारत धोकादायक असल्याची तर तीन ठिकाणी पाणी साठण्याच्या तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाल्या आहेत.
 कोसळलेल्या झाडांनी दोन वाहनांचे नुकसान
कळवा,मनीषानगर गेट नंबर-२ येथे रस्त्यावरती पार्क केलेल्या कारवरती मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास झाड पडले. याघटनेत कारचे नुकसान झाले आहे. तर श्रीनगर,अय्यप्पा मंदिर जवळ,रस्त्यावरती पार्क केलेल्या कार बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाड पडले. या घटनेतही कारचे  नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
 कळव्यात रस्त्यावर पाणी
कळवा पूर्व येथील शिवाजी नगरमध्ये तलावाजवळ असलेल्या रोडवरती बुधवारी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास पाणी साचले होते. यामुळे शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता अशी तक्रार आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -