घरठाणेविकसित भारत संकल्प यात्रेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विकसित भारत संकल्प यात्रेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Subscribe

पंतप्रधानांनी साधला लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत विविध शिबिरांचे आयोजन आज ठाण्यातील वागळे सर्कल आणि आशर आयटी पार्क येथे करण्यात आले होते. या यात्रेत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबिरार्थींची ऑनलाईन प्रणाली मार्फत संवाद साधला. यावेळी त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेबद्दल शिबिरार्थींशी चर्चा करत त्यांची मते जाणून घेतली तसेच या योजनांचा लाभ घेणार्‍या लाभार्थींची मते जाणून घेतली. तसेच यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते ‘ड्रोनदीदी’ या योजनेचा शुभारंभ ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. तसेच 10 हजाराव्या प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राचे लोकार्पण देखील त्यांनी ऑनलाईन पध्दतीने केले. वागळे सर्कल आणि आशर आयटी पार्क येथील यात्रेला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, वर्षा दिक्षीत, सहाय्यक आयुक्त समीर जाधव आदी उपस्थित होते. त्यांनी शिबिरातील सर्व स्टॉलना भेटी देऊन योजनांचे स्वरुप, लाभार्थ्यांना दिल्या जाणार्‍या सेवा यांची माहिती घेतली. कार्यक्रमाच्या ठिकाणी पी एम उज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी व अपग्रेडेशन, पी एम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन, ई- बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर देण्यात आली. आरोग्य शिबीर, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार शिबीर असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

‘ड्रोनदीदी’ योजनेचा शुभारंभ
ड्रोनदीदी या योजनेच्या माध्यमातून महिला स्वयंबचत गटामार्फत ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे.

- Advertisement -

विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक
1 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – कशीश पार्क
दु. 2.30 ते सायं. 5.30 – मनोरुग्णालय चौक

2 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – इटर्निटी मॉल चौक
दु. 2.30 ते सायं. 5.30 – बारा बंगला चौक

- Advertisement -

3 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – शिवमंदिर, कोपरी
दु. 2.30 ते सायं. 5.30 – ठाणे रेल्वे स्टेशन पूर्व

4 डिसेंबर – स. 10 ते दु. 1.30 – अष्टविनायक चौक, कोपरी
दु. 2.30 ते सायं. 5.30 – नारायण कोळी चौक, कोपरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -