घरठाणेआत्महत्या करणाऱ्या तरुणाचे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण,राबोडी पोलिसांची कामगिरी

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण,राबोडी पोलिसांची कामगिरी

Subscribe

पोलिस नियंत्रण कक्षाला मिळताच पोलीस पाच मिनिटांत घटनास्थळी दाखल

चित्रपटात आपण ऐकून आणि पाहून आहोत, की, पोलीस सर्व घडल्यानंतर येतात असा समज होऊन बसला. मात्र ठाणे शहर पोलीस दलातील राबोडी पोलिसांनी ती बाब अक्षरशः खोडून काढली आहे. राबोडी पोलिसांनी ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच, क्षणाचा ही विलंब न करता, पाच मिनिटांत घटनास्थळी धाव घेत, गळफास घेतलेल्या विबोध दत्ताराम जाधव (२६, रा. अग्रसेन टॉवर, ठाणे) या तरुणाचे प्राण वाचवले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आला. मात्र हा प्रकार मंगळवारी २८ फेब्रुवारीला आणि बुधवारी १ मार्चला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आला.

चोरी, खून, दरोडा आणि आत्महत्येची घटना घडल्यानंतर पोलिस पोहचतात. त्यातनंतर चौकशी आणि तपास सुरु होतो. हे सर्वश्रुत आहे. परंतू, ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाने एक तरुण आत्महत्येच्या तयारीत असल्याची माहिती दिल्यानंतर त्या तरुणाला पोलिसांनी अक्षरश: मृत्यूच्या दारातून बाहेर काढले.  अग्रसेन टॉवरमधील पाचव्या मजल्यावरील ५०४ क्रमांकाच्या घरात विबोध हा तरुण आत्महत्या करीत असल्याची माहिती ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला २७ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास मिळाली होती. नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी हीच माहिती तातडीने राबोडी पोलिसांना दिली. त्यानुसार रात्र पाळीतील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस हवालदार तडवी, पोलिस नाईक  पाटील, अंमलदार घडशी आणि बिट मार्शल अंमलदार यादव आणि पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घराला आतून कडी लावलेली आढळली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस पथकाने आजूबाजूच्या  रहिवाशांकडे विचारपूस करीत या सदनिकेची चावी मिळविली. तातडीने त्यांनी या घराचा दरवाजा उघडला. तेंव्हा विबोध हा पंख्याला फास लावून घेत असल्याचे आढळले. त्याला त्यांनी तातडीने खाली घेऊन त्याच्या गळ्यातील दोरी काढली. त्यानंतर त्याच्या वडिलांना ही माहिती दिली. त्याचे वडिल हे सत्संगाला तर आई मुंबई येथे नोकरीनिमित्त बाहेर गेल्याचे त्याने सांगितले.  वडीलही तातडीने घरी पोहचले. त्यानंतर या प्रकाराची माहिती देऊन मुलाला  वडिलांच्या ताब्यात दिल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी  सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -