घरठाणेकल्याण-डोंबिवलीत हजारो कार्डधारक वंचित

कल्याण-डोंबिवलीत हजारो कार्डधारक वंचित

Subscribe

केडीएमसी परिसरात कल्याणमधील एक आणि डोंबिवलीतील दोन अशा तीन रेशनिंग कार्यालये आहेत. डोंबिवली 39-एफ (उप) कार्यालयाबद्दल बोलायचे झाल्यास येथे पीएचएचच्या 38 हजार 46 शिधापत्रिका आहेत. लोकसंख्या 1 लाख 38 हजार 140 आहे. प्रति व्यक्ती 5 किलो रेशन मिळते. तसेच अंत्योदयच्या 871 शिधापत्रिका असून, त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र डोंबिवली, कल्याण आदी भागात हजारो नवीन कार्डधारक आहेत, ज्यांचे रेशनकार्ड लिंक झालेले नाही. त्यामुळे लोक लाभापासून वंचित राहतात.

कल्याण 38 फ विभागात एकंदरीत 168 रेशनिंग दुकाने अस्तित्वात आहेत यामध्ये केसरी रेशन धारकांची संख्या एक लाख तीस हजार 554 इतकी आहे. तसेच यामध्ये अंत्योदय योजनेअंतर्गत एक हजार 80 इतके शिधापत्रिका धारक असून यात प्रामुख्याने तांदूळ आणि गव्हाचे वाटप केले जाते. तसेच या ठिकाणी दारिद्र रेषेखालील शिधापत्रिका धारकांची संख्या 1000 च्या वरती असल्याचे सांगितले गेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवीन शिधापत्रिका काढणार्‍यांची संख्या हजारोंच्यावर गेले असून त्यांना मात्र शिधा वाटप दुकानदार शिधापत्रिका ऑनलाईन लिंक होत नसल्याचे कारण देत हेलपाट्या मारण्यास भाग पाडत आहेत. शिधापत्रिका असतानाही केवळ ऑनलाइन लिंक होत नसल्याच्या सबबीखाली गेल्या काही महिन्यांपासून शासनाचे अन्नधान्य त्यांना मिळत नसल्याचे समोर येत आहे. या संदर्भात कल्याणचे शिधावाटप अधिकारी दत्तात्रय नांगरे यांना विचारणा केली असता ज्यांचे शिधापत्रिका ऑनलाईन लिंक झाली नसेल अशा नागरिकांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

साड्या कार्यालयात पडून
कल्याण परिसरातील दारिद्र रेषेखालील शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबियांच्या महिलेला शासनाकडून साडी वाटपाचे धोरण असून शासनाने कल्याण शिधावाटप कार्यालयाकडे हजारोच्या संख्येने या साड्या येथे दिल्या गेल्या आहेत. साड्यांचा मोठा ढीग कल्याण कार्यालयात वाटप न केल्याने पडून आहेत. या साड्या नेमक्या केव्हा वाटप करणार असा प्रश्न देखील येथे उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -