घरट्रेंडिंगऑफर दिली बिकनीवर या, फुकट पेट्रोल घ्या; पुरूषही आले रांगेत!

ऑफर दिली बिकनीवर या, फुकट पेट्रोल घ्या; पुरूषही आले रांगेत!

Subscribe

रशियात असणाऱ्या समाराच्या ओल्वी गॅस स्टेशनने त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी खास ऑफऱ शोधून काढली

एखाद्या देशाची आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असू दे मात्र, वाहनांकरिता मोफत पेट्रोल आणि डिझेल मिळणं हे केवळ आशक्य आहे. तसेच फक्त भारतातच नाही तर जगभरात कोणतही वस्तू मोफत मिळणार असेल तर ती घेण्यासाठी तेथे गर्दी जमतेच. मात्र रशियात एक भन्नाट प्रकार समोर आला आहे. हा प्रकार तुम्हाला कळाला तर तुम्हाला देखील हासू आवरणार नाही.

अनोखी मार्केटिंग स्ट्रॅटेजी

रशियामध्ये असणाऱ्या इंधन पुरवणाऱ्या पंपावर वेगळीच ऑफर देण्यात आली आहे. रशियात असणाऱ्या समाराच्या ओल्वी गॅस स्टेशनने त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी खास ऑफऱ शोधून काढली आहे. या ऑफरद्वारे अनोखी मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे नियोजन करताना गॅस स्टेशनवर बिकिनी परिधान करून येईल त्यांना विनामूल्य इंधन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ही अनोखी ऑफर स्त्री आणि पुरूष दोघांनी वैध आहे की नाही, हे अद्याप सांगण्यात आले नाही.

- Advertisement -

बिकिनीतील पुरूषांचे फोटो होताय व्हायरल

रशियात या ऑफरला मिळणारा प्रतिसाद बघता त्य़ानंतर ही ऑफर फक्त दिवसातून तीन तासांसाठी होती, असे मालकाकडून सांगण्यात आले. असे असताना देखील रशियातील पुरूषांनी या संधीचा फायदा घेत विनामूल्य इंधन घेण्यासाठी पोहोचले. यावेळी पुरूषांना महिलांच्या बिकिनीत आलेले पाहून तेथील उपस्थित लोकांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत सर्वांनी बिकिनी घातलेल्या पुरूषांचे फोटो काढले. आता हेच फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

- Advertisement -

या आगळ्या-वेगळ्या मार्केटिंग फंडासाठी गॅस स्टेशन आणि त्याचा मालकावर बरीच टीका करण्यात आली. मात्र, या भन्नाट ऑफरमुळे रशियन पुरूषांचा उत्साह पाहता तो दिवस अविस्मरणीय ठरला. ही अशी भन्नाट ऑफऱ रशियापूर्वी यूक्रेनमध्ये असणाऱ्या एका गॅस स्टेशनवर यावर्षी देण्यात आली होती.


माकडाने चक्क मोबाईल उचलून केले सामान ऑर्डर; व्हिडिओ व्हायरल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -