कधी गायीच्या कुशीत तर कधी मानेवर बसून खेळतोय हा चिमुकला; व्हिडीओ व्हायरल

सध्या या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्या लहान मुलासोबत गायसुद्धा खेळताना दिसत आहे. यातील लहान मुलगा आधी गायीला मिठी मारून उभा होता, त्यानंतर कधी गायीच्या मानेवर तर कधी गायीच्या पुढ्यात लोळताना दिसताना दिसत आहे

हिंदू धर्मात गायीला देवी स्वरूप मानलं जातं. लहानपणा पासूनच आपल्याला गाय आपली माता असं म्हणण्याची शिकवण दिली आहे. खेड्यामध्ये अनेकजण पाळीव प्राण्यांपैकी गाईला पाळणं देखील पसंत करतात. अशावेळी घरामधील लहान मुलांची देखील या पाळीव प्राण्यांसोबत चांगलीच गट्टी जमलेली असते. अशा कुटुंबांमध्ये आणि त्यांनी पाळलेल्या प्राण्यांमध्ये एक अनोखं नातं तयार झालेलं असतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लहान मुलगा गायीसोबत खेळताना दिसत आहे.

सध्या या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्या लहान मुलासोबत गायसुद्धा खेळताना दिसत आहे. यातील लहान मुलगा आधी गायीला मिठी मारून उभा होता, त्यानंतर कधी गायीच्या मानेवर तर कधी गायीच्या पुढ्यात लोळताना दिसताना दिसत आहे. गाय सुद्धा त्याला कुरवाळते हा प्रेमळ व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. काहींच्या मते हा व्हिडीओ खूप जुना आहे. मात्र, आता तो खूप व्हायरल होऊ लागला आहे.

एका मिनिटापेक्षा जास्त व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक खूप भावूक झाले आहेत. तसेच हा व्हिडीओ अनेकांचे मन सुद्धा जिंकत आहे. या व्हिडीओमधील लहान मुलगा गायीबरोबर मस्ती करत आहे शिवाय तिला त्रासही देत आहे. मात्र गाय स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचा सर्व त्रास सहन करत त्यासोबत खेळत आहे. हा व्हिडीओ ट्वीटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनध्ये निस्वार्थ प्रेमाचे बंधन असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत १.२ मिलियन व्यूज मिळाले. याशिवाय ७३ हजारापेक्षा जास्त युजर्सनी या व्हिडीओला लाइक सुद्धा केला आहे.


हेही वाचा :…अन् पाहता पाहताच आभाळ फाटलं, ढगफुटीचा व्हिडीओ व्हायरल