घरट्रेंडिंगViral Video : लग्नात गुटखा खाणं पडलं नवरदेवाला पडलं महागात, नवरीकडून मिळाला...

Viral Video : लग्नात गुटखा खाणं पडलं नवरदेवाला पडलं महागात, नवरीकडून मिळाला प्रसाद

Subscribe

भारतीय लग्नसमारंभात नवरी आणि नवरदेव दोघंही भरपूर शांत बसलेले शक्यतो आपल्याला दिसतात. इतकतं नाही तर नवरीबाई बहुतेकदा डोक्यावर पदर घेऊन आणि खाली मान घालून बसलेली दिसते. मात्र एक लग्न समारंभात नवरीबाई अशी काही तावातावाने लग्न मंडपात बसली आहे. जे पाहून उपस्थित नातेवाईकांना हसू आवरणे कठीण झालेय. या नवरीबाईच्या रागामागचे कारणही तसेच आहे. कारण लग्नसमारंभ सुरु असताना नवरदेव चक्क तोंडात गुटखा खाऊन बसलेला असतो. मात्र लग्नात गुटखा खाणं या नवरदेवाला चांगलच महागात पडलं आहे. कारण लग्नाआधीचं पतीची वाईट सवय पाहून नवरीबाईचा राग इतका काही अनावर होतो की ती लग्न मंडपातच नवरदेवाची चक्क धुलाई करणं सुरु करते.
या धुलाईचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

- Advertisement -

या व्हिडिओवर युजर्सकडून अनेक भन्नाट-भन्नाट कमेंट्स येतायत. सध्या इंटरनेटवर व्हायरल होणाऱा हा व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, मंडपात बसलेली ही नवरीबाई किती रागावली आहे. एकीकडे लग्नाचे विधी सुरु असतात तर दुसरीकडे नवरदेव रागावलेल्या नवरीबाईला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही रागावलेली नवरीबाई कोणाचही न ऐकता नवरदेवाला बदडवायला सुरु करते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेव आणि त्याच्या मित्राने गुटखा खाल्ला आहे. हे समजताच नवरी चांगलीच खवळलीय. तिने थेट नवरीच्या मित्राला थेट मारलं आहे. तसेच नवरदेवालाही झापलं आहे.यानंतर नवरदेव एकदमं गरीबासारखा चेहरा करुन बसतो.

नवरीचा राग अनावर झालेला पाहून नवरदेव तोंडातील गुटखा थुंकतो. हे थुंकत असताना लग्न समारंभ उपस्थित नातेवाईक त्याच्याकडे बघून जोरदार हसतात. या प्रसंगामुळे नवरदेवाला एकदमंच लाजिरावाने वाटते. परंतु नवरीबाई कोणाचंही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ निरंजन महापत्रा या व्यक्तीने शेअर केला आहे. जो आत्तापर्यंत ८ हजाराहून अधिक जणांनी पाहिला आहे. नवऱ्याच्या वाईट सवयीवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्य़ात.

- Advertisement -

 

 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -