घरट्रेंडिंगसावधान ! 'Whatsapp' पाठवेल तुरुंगात ; तुम्हीसुद्धा 'हा' मॅसेज फॉरवर्ड केलाय का?...

सावधान ! ‘Whatsapp’ पाठवेल तुरुंगात ; तुम्हीसुद्धा ‘हा’ मॅसेज फॉरवर्ड केलाय का? वाचा सविस्तर

Subscribe

हल्ली अन्न,वस्त्र,निवारासह व्हॉट्सअप हीसुद्धा मुलभूत गरज बनली आहे. मात्र हीच मुलभूत गरज तुम्हाला तुरुंगात पाठवण्यास भाग पाडू शकते. जर तुम्हीही एखाद्या ग्रुपचे अॅडमिन आहात किंवा तुम्हीसुद्धा एखादा मॅसेज व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करत आहात तर तुम्हाला व्हॉट्सअॅपच्याबाबतीत थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कारण अशा गोष्टी समोर आल्या आहेत की, ज्यामुळे मॅसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागले आहे.

जर तुम्ही एखाद्या ग्रुपचे अॅडमिन आहात आणि तुमच्या ग्रुपमध्ये एखादा मेंबर काही मॅसेज फॉरवर्ड करत असेल आणि ते मॅसेज अनइथिकलसोबतच अफवा पसरवणारे असतील तर त्याची तक्रार IT सेल मध्ये तुम्हाला करावी लागेल. तुम्ही असे न केल्यास तुम्हीसुद्धा या अपराधात सामील असल्याचे सिद्ध होते. याशिवाय ग्रुपशी निगडित सर्व नागरिकांविरोधात कारवाई करण्यात येईल. जर आलेल्या मॅसेजमुळे एखादे गंभीर प्रकरण घडल्यास तुरुंगातही जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कॉन्ट्रोवर्शिअल मॅसेज फॉरवर्ड केल्यामुळे…

जर तुम्ही वादग्रस्त मॅसेज फॉरवर्ड करत असाल तर, त्यामुळेही तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल. खरेतर आपल्या सर्वांच्याच व्हॉट्सअपवर येणारे मॅसेजच्या मागे कोणतीही आधारभूत माहिती नसती. त्यामुळे त्या मॅसेजमधून अनेकांच्या भावना दुखावतात आणि छोट्याशा मॅसेजमुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता नाकारु शकत नाही. त्यामुळे अशा फॉरवर्ड मॅसेजना लगाम लागणे गरजेचे आहे. कारण असे मॅसेज करणाऱ्यांन कायद्याच्या कचाट्याच अडकावे लागेल.काही मॅसेजची गिनती ही अपराधी श्रेणीमध्ये करण्यात येते.तेच मॅसेज जर तुम्ही फॉरवर्ड केले तर, तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवली जाऊन, तुम्ही तुरुंगात जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – सावधान! Googleवर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधताय? तर ही बातमी तुमच्यासाठी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -