DYSP पदावरील मुलाने ASI आईला केला कडक सॅल्यूट! आई-लेकाचा फोटो व्हायरल

DYSP son salutes his asi mother pics will melt your heart goes viral on social
DYSP पदावरील मुलाने ASI आईला केले कडक सॅल्यूट! आई-लेकाचा फोटो व्हायरल

आपला मुलगा मेहनत घेत एक चांगला पोलीस अधिकार झाला हे पाहून कुठल्याही आई-वडीलांना अभिमानचं वाटले. परंतु आई-वडील करत असलेल्याच क्षेत्रात मुलांनेही एक गगणभरारी कामगिरी केल्यास तो आनंद त्यांच्यासाठी काही औरचं असेल. मुलाची इथपर्यंत यशस्वी मजल पाहून आई- वडील आपले दु:ख विसरुन जातील. अशाच काहीशी अभिमानास्पद प्रसंग एका आईच्या वाटाल्या आला आहे. ज्या पोलीस विभागात आई काम करते त्याचठिकाणी तिचा मुलगा पोलीस अधिकारी बनून आला. ज्यामुळे एक आई म्हणून तिला खूप गर्व वाटला. गुजरातच्या पोलीस विभागात हा प्रसंग घडला आहे. एएसआय पदावर तैनात असलेल्या आईसमोर जेव्हा तिचा मुलगा डीसीपी अधिकारी म्हणून उभा रहिला तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी डीवायएसपी पदावरील मुलाने आईला कडक सॅल्यूट ठोकला. या आई- मुलाचे अविस्मरणीय फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताय. या फोटोतील भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे.

या फोटोतून जगासमोर हे चित्रण घडतयं की, एक आई आपल्या मुलासाठी किती बलिदान देते. आपला मुलगा एवढ्या यशस्वी उंचीवर पोहचू देत की त्याला पाहून प्रत्येकाला इच्छा झाली पाहिजे की मी देखील इथपर्यंत पोहचेन. अशी मनोमन इच्छा प्रत्येक आईची असते..

गुजरात पोलीस सर्व्हिस कमिशनचे चेअरमन दिनेशा डोसा यांनी हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, एका एएसआय आईला यापेक्षा जास्त काय सुख असेल जेव्हा तिचा मुलगा डीएसपी बनून तिच्यासमोर उभा राहिला. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि आईच्या कष्टानं या शिखरावर पोहचलेल्या मुलानं भावूक होत समोर उभ्या असलेल्या आईला सॅल्यूट दिला. गुजरात पोलीस सर्व्हिस कमिशनसाठी हा एक परफेक्ट आणि अभिमानास्पद फोटो आहे. गुजरात पोलीस कमीशनच्या कौतुकास्पद फोटोंवर आता कमेंट्स पूर आलाय.

गुजरात पोलीस सर्व्हिस कमीशनच्या या कौतुकावर विशाल पाबरी नावाच्या या अधिकाऱ्याने आभार व्यक्त केले आहेत. या प्रेमळ कौतुकासाठी मी तुमचा आभारी आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गुजरात पोलीस सर्व्हिस कमीशनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. पोलीस आई-मुलाच्या या जोडीचे अनेकजण कौतुक करताय.