घरट्रेंडिंगहिंदू-मुस्लीम खेळण्यापेक्षा फुटबॉल खेळा, हरभजनचा भारतीयांना सल्ला

हिंदू-मुस्लीम खेळण्यापेक्षा फुटबॉल खेळा, हरभजनचा भारतीयांना सल्ला

Subscribe

भारत फिफा कधी खेळणार? असा सर्व भारतीयांना प्रश्न एव्हाना पडला असेलच. हरभजनलाही तो पडला. त्याने याबाबत ट्विटरवर भाष्य केलं. मात्र ते त्याला चांगलंच महागात पडताना दिसत आहे.

फूटबॉल हा जगातला सर्वाधिक पसंतीचा खेळ आहे. जगभरात २११ देश अधिकृतरित्या फूटबॉल खेळतात. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगातला दुसरा सर्वात मोठा देश असूनही भारत या खेळावर आपली छाप पाडण्यात अद्याप यशस्वी झालेला नाही. कालच फूटबॉल वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला. त्यामुळे भारत फूटबॉल वर्ल्डकप कधी खेळणार? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे, असाच सवाल टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने उपस्थित केला आहे. त्यामुळे हरभजनला नेटीझन्सनी ट्रोल केले आहे, तर काही नेटीझन्सनी हरभजनची पाठराखण केली आहे. हरभजनने फिफा विश्वचषक स्पर्धेतील रोमांचक सामन्याबद्दल ट्विट केले होते. त्यामध्ये तो असे म्हणतो की, ‘जवळपास ५० लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया हा देश विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. परंतु १३५ कोटी लोकसंख्या असलेला आपला भारत देश मात्र हिंदू-मुस्लिम खेळतोय’, त्याच्या या ट्विटने सगळ्यांनाच गुगली टाकली असून अनेकांना हरभजनचे हे वक्तव्य रुचले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

- Advertisement -

भारतालाही फिफा विश्वचषकात पाहण्याची इच्छा

फिफा विश्वचषक २०१८ स्पर्धेचा काल रशियात अंतिम सामना झाला. अख्ख्या जगाचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले होते. फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया यांच्यामध्ये अत्यंत रोमहर्षक लढत झाली. यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या इंग्लंडला नमवत क्रोएशिया या लहान देशाचा फुटबॉाल संघ अंतिम सामन्यात पोहोचला. अंतिम सामन्यात क्रोएशियाचा फ्रान्सने ४-२ असा पराभव केला. अंतिम सामना जरी क्रोएशियाचा संघ हरला असला तरी जगभरातील फुटबॉल प्रेमींची मनं या संघाने जिंकली. सामना पाहणाऱ्यांनी विविध सोशल मीडिया साइट्सवर सामन्याबाबतची उत्सुकता, उत्कंठा आणि सामन्याबाबतचे अंदाज व्यक्त केले होते. याचप्रमाणे हरभजननेदेखील ट्विट केले होते. भारतालाही फिफा विश्वचषक सामन्यात पाहण्याची हरभजनची इच्छा असल्याचे त्याच्या ट्विटमध्ये पहायला मिळाली.

- Advertisement -

समर्थन आणि विरोथ

काहींनी हरभजनच्या ट्विटवर कमेंट करुन म्हटले आहे की, जसे ते देश फुटबॉलमध्ये पुढे आहेत तसा भारत क्रिकेट, कबड्डीसारख्या खेळात पुढे आहे. यावर ‘ऑलम्पिकच्या पदकतालिकेतले भारताचे स्थान पाहिले की लक्षात येते की भारत खेळात किती पुढे आहे हे समजते’, असे प्रत्युत्तर काही नेटीझन्सनी दिले आहे आणि हरभजनने उपस्थित केलेला प्रश्न योग्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान हरभजनने ट्विट करत भारताने फुटबॉल विश्वचषक खेळावा, अशी इच्छा व्यक्त केली असली तरी, ती व्यक्त करण्याची पद्धत चुकीची होती, असे मतही काहींनी व्यक्त केले आहे. एकंदरीत काहिंनी हरभजनचे समर्थन केले आहे. तर काहिंनी त्याला विरोध दर्शवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -