घरट्रेंडिंगLockdown : आत्म्यासारखेच आसपासच भटकतोय, बंद दुकानावर मोबाईल नंबर लिहिण्याची शक्कल, खाकीतला...

Lockdown : आत्म्यासारखेच आसपासच भटकतोय, बंद दुकानावर मोबाईल नंबर लिहिण्याची शक्कल, खाकीतला अधिकारी म्हणाला…

Subscribe

देशात लॉकडाऊन जाहीर केल्याने अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकानांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. यात दारुच्या दुकानांवरही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून सोशल मीडियावर सतत मजेदार मीम्स, फोटो, मेसेजेस व्हायरल होत आहे. दारुची दुकाने सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत सुरु ठेवण्याची सक्ती असल्याने एका दुकानदाराने बंद दुकानावर मोबाईल नंबर लिहित एका नमी शक्कल लढवली आहे. सध्या याचा एक मजेदार फोटो व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. इतकेच नाही तर यावर एका आयपीएस अधिकाऱ्यानेही यावर भन्नाट उत्तर दिले आहे.

- Advertisement -

वेळेच्या सक्तीमुळे दारुचे दुकान संपूर्ण दिवस सुरु नाहीत यामुळे दारु दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हेच आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी दुकानदाराने दुकानाबाहेर एक मजेशीर सुचना लिहिली आहे. यासंदर्भातील पोस्टर दुकानदाराने आपल्या दुकानावर चिटकवले आहेत. या पोस्टर लिहिले आहे की, जर माझे दुकान तुम्हाला बंद दिसले तर मला संपर्क करा, मी आत्म्यासारखेच आसपासच भटकतोय.

- Advertisement -

दरम्यान यावर एका आईपीएस अधिकाऱ्याने असे भन्नाट उत्तर दिले आहे की तुम्हालाही हसू आवरणार नाही. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी याचा एका फोटा आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर करत  कॅप्शन लिहिली की, भटकत्या आत्मेची लवकरचं खाकी वर्दीशी भेट होणार आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक युजर्सही भन्नाट भन्नाट कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या फोटोवर कमेंट्स करत एका युजर्सने लिहिले की, खाकी आत्म्यांचे काय वाकडे करणार आहे. यासह अनेक युजर्सने कमेंट्सचा पूर आणला आहे.


Corona Vaccination : लसीकरणाचे प्रमाण पत्र दाखवत घेऊन जा दारु, उत्तरप्रदेशातील दुकांनाबाहेरील पोस्टर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -