घरट्रेंडिंगमहान गिटार वादक, संगीतकार बी.बी.किंग यांना गुगलने समर्पित केलं डूडल

महान गिटार वादक, संगीतकार बी.बी.किंग यांना गुगलने समर्पित केलं डूडल

Subscribe

आज जगातील महान गिटार वादक बी.बी. किंग यांचा ९४ व्या वाढदिवस

आज जगातील महान गिटार वादक बी.बी. किंग यांचा ९४ व्या वाढदिवस आहे. यानिमित्ताने गुगल या सर्च इंजिनने बी.बी.किंग यांचे डूडल साकारत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना गुगलने बी.बी.किंग यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कारकिर्दीवर आधारलेला एक व्हिडिओ स्वरूपात डूडल साकारले आहे. तसेच, गुगलने डूडलच्या या विशेष व्हिडिओमध्ये त्याच्या सर्वात प्रसिद्ध गिटारला प्ले करण्यात आले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्या आयुष्यातील करिअरचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

जाणून घ्य़ा कोण होते बी.बी. किंग

  • बी. बी. किंग यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२५ रोजी अमेरिकेच्या इंडोलाजवळील मिसिसिपी येथे झाला होता. सुरुवातीच्या काळात ते रस्त्यावर गायचे. कधी कधी रात्री वस्त्यांवरही कार्यक्रम करायचे. पुढे संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी मेम्फिसची वाट धरली.
  • १९४८मध्ये रेडिओवर गाण्याची पहिली संधी त्यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी ‘बील स्ट्रीट ब्लूज बॉय’ नावाने रेडिओवर कार्यक्रम सादर करण्यासा सुरुवात केली. पुढे या कार्यक्रमाचं नाव ‘ब्लूज बॉय किंग’ असं ठेवण्यात आलं.
  • ‘बी बी किंग’ हे त्याचं शॉर्टफॉर्म नाव फेमस झालं आणि किंग यांनाही याच नावानं ओळखलं जाऊ लागलं.
  • ‘द थ्रिल इज गॉन’ आणि ‘एव्हरी डे आय हॅव दे ब्लूज’ हे त्यांचे मास्टरपीस मानले जातात. ‘थ्री ओ क्लॉक्स ब्लूज’ हा त्यांचा शोही प्रचंड लोकप्रिय होता.
  • या महान कलाकाराचा मृत्यू २०१५मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी झाला. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधूमेहाचा त्रास होता. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -