घरट्रेंडिंग'झिरो'चे प्रमोशन विराटला पडले महागात

‘झिरो’चे प्रमोशन विराटला पडले महागात

Subscribe

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने झिरो या चित्रपटाचे सोशल मीडियावर प्रमोशनं केले होतं. मात्र हे प्रमोशनं विराटला चांगलेच महागात पडले आहे. विराटला संघातील झिरोकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत ‘Zero’ हा चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर कोहलीने या चित्रपटाचे खुप कौतुक केले आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांचे आणि विशेष म्हणजे अनुष्काच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. या चित्रपटा संदर्भात कोहलीने ट्विट देखील केले आहे. त्यात त्यांनी असे लिहीले आहे की, ‘झिरो’ हा चित्रपट खूप चांगला आहे. या चित्रपटात सर्वच कलाकारांनी खूप चांगले काम केले असून या चित्रपटाने मनोरंजन देखील केले आहे. ‘झिरो’ हा चित्रपट मला खूप आवडला असून अनुष्काचे काम फार आवडले आहे. तिचे पात्र हे आव्हानात्मक होते. तरीही तिने ते चांगल्या पद्धतीने साकारले आहे. मात्र कोहलीने केलेल्या कौतुकामुळे नेटिझन्स चांगलेच भडकले आहेत. नेटिझन्सने कोहलीला संघातील ‘Zero’ कडे म्हणजेच अर्थात लोकेश राहुलकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

या चित्रपटातील अनुष्काची मुख्य भूमिका

विराट कोहलीने याआधीही अनुष्काच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली होती. ‘झिरो’मध्ये अनुष्काने शाहरुखसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. यासह कॅटरिना कैफही या चित्रपटात आहे. या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असताना कोहलीने या चित्रपटाचे कौतुक केल्याने नोटिझन्स यावर चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे विरोट कोहलीला Zero या चित्रपटाचे प्रमोशन महागात पडलं आहे.

- Advertisement -

वाचा – झिरो आपटला तरी अनुष्काच्या कामाबाबत विराट म्हणतो..


- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -