Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन झिरो आपटला तरी अनुष्काच्या कामाबाबत विराट म्हणतो..

झिरो आपटला तरी अनुष्काच्या कामाबाबत विराट म्हणतो..

Subscribe

अभिनेत्री अनुष्का शर्माने गेल्या काही काळापासून केलेली कामे समीक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. सध्या तिचा झिरो हा चित्रपट तिकिटबारीवर आदळला असला तरी तिच्या कामाचे मात्र कौतुक होत आहे. आफिया भिंदर नामक नासाची महिला शास्त्रज्ञाचे पात्र तिने साकारले आहे. आफियाला मेंदूचा अर्धांगवायू आलेला असून ती व्हिलचेअरला खिळलेली दाखवली आहे. तसेच शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ देखील मुख्य भुमिकेत आहेत. अनुष्काचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे, तिथे वेळात वेळ काढून त्याने झिरो पाहिला असून त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहलीने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी झिरो पाहिला असून या चित्रपटाने चांगली करमणूक केली आहे. प्रत्येकाने त्याच्या वाट्याला आलेले काम चांगले केले आहे. खासकरुन अनुष्काचे काम मला भावले. हा अवघड रोल असून तिने उत्कृष्ट काम केले आहे.”

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सुई धागा सिनेमात अनुष्काने एका छोट्या शहरातील मध्यम वर्गातील गृहिणीचा रोल केला होता. वरुण धवणसोबत केलेल्या या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले होते. विराट सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून तिसऱ्या कसोटीसाठी तो मेलबर्न येथे आलेला आहे. अनुष्काही आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. दोघेही ऑस्ट्रेलियात काही काळ एकमेकांसमवेत घालवत आहेत.

हे बघा – नावाप्रमाणेच ठरला झिरो

- Advertisement -

शाहरूख, कॅटरिना आणि अनुष्का या तिघांनी २०१२ साली ‘जब तक है जान’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर आता तिघे झिरोमधून एकत्र आले आहेत. झिरोला सध्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. रिलीज झाल्याच्या दिवशी चित्रपटाने २० कोटींची कमाई केली होती. मात्र ही कमी होऊन शनिवारी चित्रपटाने १८ कोटींची कमाई केली.

हे वाचा – ‘झिरो’च्या सेटवरील श्रीदेवींचा अखेरचा फोटो व्हायरल 

- Advertisment -