घरट्रेंडिंगBalakot Air Strike: दोन वर्ष पूर्ण; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? जाणून...

Balakot Air Strike: दोन वर्ष पूर्ण; ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Subscribe

पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या बालाकोट एअर स्ट्राईकला आज दोन वर्ष पूर्ण झाली. १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्यही बिथरलं त्यांना प्रत्युत्तर देण्याची संधीही भारताने दिली नाही. बालाकोट हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले होते. ग्वालियरपासून उड्डाण घेतलेले भारतीय वायूसेनेचे १५ मिराज २००० ही लढाऊ विमाने मध्यरात्री साडेतीन वाजता पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत घुसली. या विमानाने बालाकोट भागात बॉम्ब हल्ले चढवले. जैशच्या दहशतवादी तळांना टार्गेट केले गेले. यानंतर अनेक दहशतवादी ठार झाले.

- Advertisement -

या हल्ल्यानंतर या भ्याड कृत्यासाठी जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मद ही दहशतवाजदी संघटना आणि पाकिस्तानवर कारवाई करण्यात यावी, अशी देशभरातील जनतेची भावना होती. याच पार्श्वभूमीवर पुलवामा हल्ल्याला १२ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच भारतीय हवाई दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली. हा हल्ला झाल्यानंतर १५ फेब्रुवारीला संरक्षण विषय कॅबिनेट समितीची बैठक पार पडली. यामध्ये पाकिस्तानवर प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्यास काही पर्याय देण्यात आले. तसेच, सर्जिकल स्ट्राईकऐवजी अन्य काही मार्गाने प्रत्युत्तर देण्याचे ठरवण्यात आले. यानंतर एअर स्ट्राईक करण्याच्या पर्यायावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

- Advertisement -

‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

जम्मू काश्मीर येथील पुलवामा हल्ल्यानंतर भारताने ही कारवाई केली होती. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. २६ फेब्रुवारी २०१९ च्या रात्री जवळपास साडे तीन वाजता भारतातून १२ मिराज २००० लडाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानात प्रवेश केला होता. पाकिस्तानात प्रवेश करुन भारतील हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्प्सना लक्ष्य केले होते. भारताच्या हल्ल्यात हे दहशतवादी कॅम्पस् उद्ध्वस्त करण्यात आले. हवाई दलाच्या मिराज २००० आणि सुखोई एसयू ३० या विमानांनी हा एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात जैशच्या जवळपास २५० दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. उरी आणि बालाकोट या दोन्ही हल्ल्यानंतर भारताने दाखवून दिले की आता पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला आता चोख उत्तर दिलं जाणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -