घरट्रेंडिंग'त्या' शेळीला न्याय मिळवून देण्यासाठी नेटीझन्सनी सुरू केली मोहीम

‘त्या’ शेळीला न्याय मिळवून देण्यासाठी नेटीझन्सनी सुरू केली मोहीम

Subscribe

दोन दिवसांपूर्वी हरयाणामध्ये ८ विकृतांनी एका गर्भवती शेळीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. अत्याचारानंतर पीडित शेळी मृत्यूमुखी पडली. या शेळीला न्याय मिळवून देण्यासाठी नेटीझन्सनी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली आहे.

गर्भवती शेळीवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच हरयाणा येथे समोर आली. त्यामुळे पुन्हा एकदा प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधीदेखील मुख्या जनावरांवर अत्याचार, मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मुक्या जनावरांना न्याय मिळवून देण्यासाठी एक मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम ट्विटरसह इतर सोशल मीडियावर सुरू आहे. मुक्या जनावरांवरील अत्याच्याराच्या घटना थांबाव्यात हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. या मोहिमेसाठी नेटीझन्सनी मोहिमेसाठी एका हॅशटॅगचा वापर सुरू केला आहे. नेटीझन्सनी सुरू केलेला #JusticeforGoat हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंडींगमध्ये आहे. या कृत्यावर बॉलीवूड सेलिब्रिटीदेखील व्यक्त होत आहे. बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरनेदेखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे. फरहानने यासंदर्भात ट्विट केले आहे. तर जॉनने माध्यमांसमोर या घटनेविरोधात संताप व्यक्त केला.

नक्की घटना काय?

हरयाणातील मेवात या गावामध्ये २५ जुलैच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. तब्बल आठ विकृत लोकांनी एका गर्भवती शेळीवर अनैसर्गिक बलात्कार केला. यामध्ये गंभीर बाब म्हणजे अत्याचारांनंतर पीडित शेळी मृत्यूमुखी पडली. या प्रकरणी शेळी मालकाने गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत. आत्तापर्यंत त्यापैकी दोन जणांची ओळख पटली असून, इतर पाच आरोपींची ओळख पटलेली नाही. हारून व जाफर अशी ओळख पटलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. गर्भवती शेळीवर अनैसर्गिक अत्याचार झाल्यानंतर शेळीचे मालक असलू यांनी पोलिसांकडे गुन्हा नोंदवला. सर्व आरोपी हे स्थानिक असून ते सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची सर्व स्तरातून चर्चा होत असून देशात हे काय सुरु आहे असा प्रश्न फरहान अख्तरने विचारला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

काय म्हणाला जॉन?

“या घटनेमुळे मी गोंधळलो. मी एक भारतीय आहे आणि आपल्या देशात महिला आणि प्राणी सुरक्षित नाहीत. प्राणीमात्रांवर प्रेम करा अशी धर्म शिकवण देतो. आपण मात्र त्याचे पालन करत नाही अशा प्राकरची कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -