घरट्रेंडिंगViral Video: 'लँड करा दे' म्हणणारा 'तो' मुलगा Viral Videoमुळे आता...

Viral Video: ‘लँड करा दे’ म्हणणारा ‘तो’ मुलगा Viral Videoमुळे आता झालाय मालामाल

Subscribe

विपीनला एअरफोबिया असल्याचं त्याचं लक्षात आलं आणि त्याने त्यावर मात करायचं ठरवलं. विपीनने पॅराग्लाइडिंग सुरू आणि आज तो पॅराग्लाइडिंग करायला अजिबात घाबरत नाही.

सोशल मीडियावर कधी कोण कसं व्हायरल होईल काही सांगता येत नाही. २०१९मध्ये मनाली ट्रिपमध्ये पॅराग्लाइडिंग करणारा तो मुलगा तुम्हाला आठवत असेल. ‘लँड करा दो’ असं म्हणतं ओरडणाऱ्या त्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल होता मात्र एका व्हायरल व्हिडिओमुळे तो मुलगा आता मालामाल झाला आहे. विपीन असे त्या मुलाचे नाव असून तो उत्तर प्रदेशमध्ये राहतो. मागील काही दिवसात तो एक सेलिब्रेटीच बनला आहे. टीव्ही शो आणि काही म्युझिक अल्बममध्ये देखील तो दिसला होता. त्याचप्रमाणे तो आता एंटरप्रेन्यूअर देखील बनला आहे.

विपीन कुमारने आजतकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, २०१९मध्ये व्हिडिओ व्हायरल होण्याआधी महिन्याला १०-१२ लाखांची विक्री होत होती मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिन्याला १५-२० लाख रुपये कमावत आहे. त्यानंतर मी माझा एक व्यवसाय देखील सुरू केला. स्वत:ची जीम सुरू केली. आता एका नवीन स्टार्टअप कंपनीत इनव्हेस्टमेंट करत आहे.

- Advertisement -

२०१९मध्ये विपीन कुमार मनालीला फिरण्यासाठी गेला होता. तिथे पॅराग्लाइडिंग करताना तो अतिशय घाबरला. उंचावर गेल्यावर त्याला भिती वाटली आणि तो मोठ मोठ्याने ओरडू लागला. विपीनला एअरफोबिया असल्याचं त्याचं लक्षात आलं आणि त्याने त्यावर मात करायचं ठरवलं. विपीनने पॅराग्लाइडिंग सुरू आणि आज तो पॅराग्लाइडिंग करायला अजिबात घाबरत नाही.

विपीनचा व्हिडिओ त्याने पहिल्यांदा पाहिला तेव्हा तो व्हिडिओ कुठेही व्हायरल होऊ नये असे त्याला वाटत होते मात्र त्याच्या भावाने तो व्हिडिओ व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विपीनला अनेकांनी ट्रोल केलं पण या ट्रोलिंगचा नंतर मला फायदाच झाला असं विपीननं सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – Desi Jugad: केस सुकवण्यासाठी देसी जुगाड! प्रेशर कुकर बनला हेअर ड्रायर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -