घरताज्या घडामोडीदेशांतर्गत प्रवासासाठी RTPCR निगेटीव्ह असणं बंधनकारक, केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्याच्या आरोग्य विभागाच्या...

देशांतर्गत प्रवासासाठी RTPCR निगेटीव्ह असणं बंधनकारक, केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना पत्र

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या नवीन व्हेरियंटमुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. युरोपातील अनेक देशांनी खरबदारीचा उपाय म्हणून सीमा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलंय. कोविड-१९ च्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्रीय आरोग्य सचिवांकडून राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहेत. या पत्राद्वारे सचिवांनी ओमिक्रॉनचा धोका वाढू नये, यासाठी कोणते निर्बंध लादणे महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारची गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

देशांतर्गत प्रवासासाठी RTPCR निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक असणार आहे. यापूर्वी लसी चे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक होतं. परंतु ७२ तासापर्यंतचा आरटीपीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक असल्याचं सांगितलं जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली असून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी १४ दिवस होम क्वारंटाईन करणं महत्त्वाचं असणार आहे. तसेच त्यांच्या आगमनानंतर RTPCR निगेटिव्ह येणं बंधनकारक आहे. मुंबईत उतरल्यानंतर उड्डाणे आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी ४८ तासांपूर्वी RTPCR चा अहवाल निगेटिव्ह असणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना पत्र लिहिलं आहे.

केंद्र सरकारनेही १५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेचा निर्णय स्थगित केला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे सरकारने हा निर्णय तुर्तास स्थगित केला आहे. पुढील परिस्थितीचा अहवाल बघितल्यानंतर नवीन तारखेची घोषणा केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -