Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Video: पठ्ठ्यानं चिकन बर्गरचं बनवलं आईस्क्रीम, नेटकरी पाहून झाले हैराण

Video: पठ्ठ्यानं चिकन बर्गरचं बनवलं आईस्क्रीम, नेटकरी पाहून झाले हैराण

Related Story

- Advertisement -

प्रत्येकाला मॅक डोनाल्ड्सचा (Mc Donald’s) बर्गर खूप आवडतो. मग तो कोणताही असो. मॅक डोनाल्ड्सचे आईस्क्रीम देखील तितेकच लोकांना आवडते. परंतु पाकिस्तानच्या एका पठ्ठ्याने अशी काही क्रिएटीव्हिटी दाखवली आहे, जी पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. लोकं हा व्हिडिओ पाहून म्हणतात की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मॅक डोनाल्ड्स आपला चिकन बर्गर बंद करेल.’ सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचा एक व्यक्ती मॅक डोनाल्डच्या चिकन बर्गरपासून आईस्क्रीम बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व जण असाच विचार करत आहेत की, ‘चिकन बर्गरपासून बनवलेलं या आईस्क्रीमची चव नेमकी कशी असेल?’ शिवाय लोकं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर मजेशीर मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ दर्शन पाठक (@darshanpathak) नावाच्या युजरने शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘हे पाहिल्यानंतर मॅक डोनाल्ड्स पूर्णपणे चिकन मॅक बंद करेल’ व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्यक्ती पहिल्यांदा चिकन मॅक बर्गर बॉक्समधून काढतो. त्यानंतर त्याचे तो तुकडे-तुकडे करतो. मग तो त्यामध्ये दूध आणि क्रीम खालून त्याचे आईस्क्रीम बनवतो.

- Advertisement -

चिकन मॅक बर्गरपासून आईस्क्रीम बनवणारी ही रेसिपी पाकिस्तानच्या चौधरी ( Chaudairy) आईस्क्रीम पार्लरची आहे. येथे ताजी फळं, चॉकलेट पासून त्वरित आईस्क्रीम बनवून ग्राहकांना दिलं जात. परंतु बर्गरपासून बनवलेलं हे आईस्क्रीम पाहून लोकं हैराण झाले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – अरे व्वा! ‘इथं’ मिळतंय फ्रीमध्ये पेट्रोल पण ‘हे’ करावं लागणार


 

- Advertisement -