घरट्रेंडिंग...म्हणून डास माणसांचं रक्त पितात; तुम्हाला माहितीये का कारण?

…म्हणून डास माणसांचं रक्त पितात; तुम्हाला माहितीये का कारण?

Subscribe

जाणून घ्या कारण...

तुम्हाला माहिती आहे का, डास म्हणजेच मच्छरं आपले रक्त का शोषतात? रक्त पिण्याची सवय त्यांना कशी जडली? याचे उत्तर शास्त्रज्ञांना सापडले आहे. ज्या शास्त्रज्ञांना ते सापडले त्यामागचे कारण जाणून घेतल्यास आपण आश्चर्यचकित व्हाल. कारण जगाच्या सुरुवातीस डासांना रक्त पिण्याची सवय नव्हती. यामध्ये हळू हळू बदल झाला आहे. डास कोरड्या जागेत राहत असल्याने मानवांचे आणि इतर प्राण्यांचे रक्त पिण्याची त्यांना सवय लागली. जेव्हा जेव्हा हवामान कोरडे असते आणि डासांना त्यांच्या प्रजननासाठी पाणी मिळत नाही तेव्हा ते मानवाचे किंवा प्राण्यांचे रक्त शोषू लागतात.

न्यू जर्सी येथील प्रिन्सटन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आफ्रिकेच्या एडीज एजिप्टीच्या (Aedes Aegypti) डासांचा अभ्यास केला. हेच डास आहेत त्यांच्यामुळे झिका विषाणूचा प्रसार होतो. यामुळेच डेंग्यू आणि पीतज्वर माणसाला येतो. तर न्यू सायंटिस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आफ्रिकेच्या डासांमध्ये एडिस एजिप्टी डासांच्या अनेक प्रजाती आहेत. सर्व प्रजातींचे डास रक्त पिऊ शकत नाहीत. इतर बर्‍याच गोष्टी खाऊन पिऊन ते जगतात.

- Advertisement -

प्रिन्सटन युनिव्हर्सिटीचे संशोधक नोआह रोज म्हणतात की, वेगवेगळ्या प्रजातींच्या डासांच्या आहाराचा अभ्यास अद्याप कुणीही केलेला नाही. आम्ही आफ्रिकेच्या सब-सहारन प्रदेशात २७ ठिकाणी एडीस एजिप्टी डासांची अंडी घेतली. त्यानंतर आम्ही या अंड्यांमधून डास काढून टाकला. त्यानंतर त्यांना प्रयोगशाळेतील बंद कपाटांमध्ये सोडले जेणेकरुन त्यांचे रक्त पिण्याची पद्धत समजू शकेल. एडिस एजिप्टी डासांच्या विविध प्रजातींच्या डासांचे अन्न पूर्णपणे भिन्न असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

नोआह सांगतात की सर्व डास रक्त पितात हे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. जेथे जास्त दुष्काळ किंवा उष्णता आहे, पाणी कमी असेल तेथे डासांना प्रजननासाठी ओलावा असणे आवश्यक आहे. पाण्याची कमतरता भागविण्यासाठी डास माणसांचे व इतर प्राण्यांचे रक्त पिण्यास सुरूवात करतात.

हा बदल डासांमध्ये हजारो वर्षात आला आहे. एडीस एजिप्टी डासांची एक खास गोष्ट अशी की, वाढत्या शहरांमुळे ते पाणीटंचाईवर झुंज देऊ लागले. त्यानंतर त्यांना मानवी रक्त पिण्याची गरज भासू लागली.

परंतु, जेथे माणसे पाणी साठवतात, तिथे अ‍ॅनोफिलस डासांना (मलेरिया) कोणतीही समस्या निर्माण होत नाही. ते कूलर, भांडीसारख्या ठिकाणी आपली पैदास करतात. परंतु पाण्याची कमतरता येताच ते रक्त पिण्याकरिता मानवांवर किंवा इतर प्राण्यांवर त्वरित हल्ला करतात.


दिलासा! भारतात विकसित केलेल्या कोरोना लसीची AIIMS मध्ये मानवी चाचणी सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -