Video Viral: कोरोना काळात पाकिस्तानी क्रिकेटर वहाब रियाझ मैदानाबाहेर विकू लागला चणे

Pakistan pacer Wahab Riaz sells chana on streets, video goes viral
Video Viral: कोरोना काळात पाकिस्तानी क्रिकेटर वहाब रियाझ मैदानाबाहेर विकू लागला चणे

कोरोना वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरात पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका, युरोपसह अशियातील काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. भारतात दिल्ली, महाराष्ट्रामध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडून सातत्याने नागरिकांसाठी आदेश जारी करून कोरोनापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. यादरम्यान अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या पाकिस्तानी क्रिकेटर वहाब रियाझचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो चणे विकताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर वहाब रियाझ मैदाना बाहेर वेगळ्या अंदाजात दिसत आहे. वहाब चणे भाजताना दिसत आहे. त्याला पाहून एक व्यक्ती तिथे थांबतो आणि वहाब त्याला विचारतो की, काय बनवू आणि किती बनवू? हे ऐकूण तो व्यक्ती हसायला लागतो.

पण काही वेळानंतर वहाब चणेवाल्याला म्हणतो की, हे काम तुम्हीच करू शकता. दरम्यान व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला एक कार उभी दिसत आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की, वहाब या कारमधून प्रवास करण्यासाठी बाहेर पडला होता आणि त्याला रस्त्यात चणेवाला दिसला. त्यानंतर त्याच्या मनात आपण हे काम करावे असे वाटले. हा व्हिडिओ वहाबने स्वतः ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १७८.१के व्ह्यूज मिळाले असून १५.९के लाईक्स मिळाले आहेत.


हेही वाचा – कोरोनाबाधित मुलीने टिंडरवर शोधला कोरोना पॉझिटिव्ह जोडीदार, नंतर एकत्र आयसोलेट होण्याची दिली ऑफर