कोरोनाबाधित मुलीने टिंडरवर शोधला कोरोना पॉझिटिव्ह जोडीदार, नंतर एकत्र आयसोलेट होण्याची दिली ऑफर

Woman forced to isolate with Tinder date after both test positive for Covid-19
कोरोनाबाधित मुलीने टिंडरवर शोधला कोरोना पॉझिटिव्ह जोडीदार, नंतर एकत्र आयसोलेट होण्याची दिली ऑफर

सध्या ऑनलाईन डेटिंगचे खूप सारे ॲप्स आहेत. जिथे मुली, मुलं आपल्या जोडीदाराचा शोध घेत असतात. अशी एक कोरोनाबाधित मुलगी टिंडरवर आपला जीवनसाथी शोधत होती. ती कोरोनाबाधित मुलाच्या शोधात होती. शेवटी तिला टिंडरवर एक कोरोनाची लागण झालेला मुलगा सापडला. नंतर दोघे एकत्र आयसोलेट झाले.

ही घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, संबंधित मुलीने स्वतः सोशल मीडियावर याबाबत शेअर केले होते. तिला नातेसंबंध आणि तिचा जोडीदारबाबत विचारले असताना ती म्हणाली की, डेटिंग ॲप टिंडरवर तिला जोडीदार मिळाला होता. यादरम्यान दोघंही कोरोनाबाधित असल्याचे समजले. पहिल्यांदा दोघे हैराण झाले आणि मग नंतर अशावेळी काय करायचे हा विचार करू लागले.

नंतर मुलीने डेटिंग जोडीदाराला आपल्यासोबत आयसोलेट होण्याची ऑफर दिली. त्यावेळेस मुलाला थोडं हे अजीब वाटले. पण नंतर तो तयार झाला. आता दोघे एकत्र घरात आयसोलेट आहेत. परंतु अधिकृत नातेसंबंधात नाहीत. या मुलीचे नाव सारा असल्याचे सांगितले आहे.

या मुलीने आपल्या डेटिंग पार्टनरसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून तिचा अनुभव सांगितला आहे. तिने कोरोना रिपोर्ट शेअर करत एकत्र चांगला वेळ घालवत असल्याचे सांगितले आहे. ते सध्या एकत्र गेम खेळत आहेत आणि खूप सारे कपडे धूत आहेत. हा कोरोना काळ दोघे एन्जॉय करत आहेत आणि ते खूप खुश आहेत. शेवटीने मुलीने कोरोनाला हलक्यात घेतले नाही पाहिजे असा सल्ला दिला आहे.


हेही वाचा – काय सांगता? ऐन कोरोनाच्या महामारीत माकडाच्या अंत्ययात्रेला 1500 लोकांची गर्दी