Video : ऐश्वर्याच्या गाण्यावर तरुणाचा लेहंग्यावर अफलातून डान्स

हा व्हिडिओ पाहून तुम्ही त्याच्या डान्सच्या आवडीचा अंदाज लावू शकता

this man dance in skirt on aishwarya rai song winning heart online
ऐश्वर्याच्या गाण्यावर तरुणाचा लेहंग्यावर अफलातून डान्स

बॉलिवूड चित्रपटांचे संगीत ऐकताच लहानांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत सगळ्यांचे पाय आपोआप थिरकू लागतात. धडधड वाढते आणि ह्रदयाला गाण्याचे बीट आपलेसे वाटू लागतात. अशा स्थितीत कोणताही व्यक्ती स्वत:ला नाचण्यापासून थांबवू शकत नाही. अमेरिकेतही असाच एक भारतीय तरुण बॉलिवूड गाण्याचा इतका मोठा चाहता आहे की तो स्वत:ला या गाण्यांवर नाचण्यापासून रोखू शकत नाही. हा तरुण अमेरिकेच्या रस्त्यांवर इतका जबरदस्त नाचतोय की, जे पाहून जग त्याचा फॅन झालयं. केवळ डान्सच नाही तर या तरुणाचा ड्रेसिंग सेन्सही लोकांना आवडतोय. हा तरुण स्कर्ट आणि कुर्ता परिधान करत रस्त्यावर अगदी मनमोकळं नाचतोय. आता या तरुणाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो ऐश्वर्या राय बच्चनच्या गाण्यावर इतका भन्नाट, पावर फूल डान्स करतोय की जे पाहून युसर्जही त्याच्या प्रेमात पडलेय.

‘बरसो रे’ गाण्यावर तरुणाचा भन्नाट डान्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Jainil Mehta (@jainil_dreamtodance)

तरुणाचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये जैनील मेहता हा तरुण ‘बरसो रे’ गाण्यावर डान्स करताना दिसतोय. ज्यात त्याने स्कर्ट आणि कुर्ता परिधान केलाय. त्यात तो खूप छान नाचतो. तिचा व्हिडीओ पाहून लक्षात येते की, तो त्याच्या डान्सबद्दल आणि तिच्या पोशाखाबद्दल किती आत्मविश्वासी आहे. इंस्टाग्रामवर त्याने हा व्हिडीओ शेअर कॅप्शन लिहिले की, त्याने या डान्ससाठी अजिबात तयारी केली नव्हती. उलट तो असाच मन लावून नाचू लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jainil Mehta (@jainil_dreamtodance)

तिने पहिल्यांदाच स्कर्ट घालून डान्स केला असे नाही. त्याचे जर तुम्ही इन्स्टाग्राम पाहिले तर तुम्हाला असे स्कर्ट घालून डान्स करतानाचे त्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याचे व्हिडीओ भारतीय लोकांसोबतच परदेशातील लोकांनाही खूप आवडत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jainil Mehta (@jainil_dreamtodance)

हा व्हिडिओ पाहून तुम्ही त्याच्या डान्सच्या आवडीचा अंदाज लावू शकता. हा तरुण लोक काय विचार करतील याची त्याला पर्वा न करता, तो कुठेही मस्ती करत नाचू लागतो.


विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! 15 जूनपासून शाळा सुरु