घरट्रेंडिंग'वर्ल्ड म्युझिक डे'ला ट्रेंडिंग आहेत 'ही' नवी गाणी

‘वर्ल्ड म्युझिक डे’ला ट्रेंडिंग आहेत ‘ही’ नवी गाणी

Subscribe

रोज ऑफिसला जातानादेखील युट्यूबवर आज कोणती गाणी ट्रेंड आहेत हे आपल्याला माहीतच असते. तर आजच्या या 'वर्ल्ड म्युझिक डे'ला युट्यूबवर अजून प्रदर्शित न झालेल्या कोणत्या चित्रपटातील गाणी ट्रेंडिंग आहेत ते जाणून घेऊया.

वर्ल्ड म्युझिक डे अर्थात जागतिक संगीत दिवस २१ जूनला साजरा करण्यात येतो. संगीत हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. आपल्याला गाता येवो वा न येवो प्रत्येकालाच सूर मात्र कळत असतो. संगीत हा मनोरंजनाचा एक मार्ग असला तरी ते ऐकल्यामुळं मनाला शांतता मिळते. संगीत हे शरीरासाठीदेखील चांगलं आहे हे विज्ञानातदेखील सिद्ध झालं आहे. रोज ऑफिसला जातानादेखील युट्यूबवर आज कोणती गाणी ट्रेंड आहेत हे आपल्याला माहीतच असते. तर आजच्या या ‘वर्ल्ड म्युझिक डे’ला युट्यूबवर अजून प्रदर्शित न झालेल्या कोणत्या चित्रपटातील गाणी ट्रेंडिंग आहेत ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंगमधील गाणी

लिस्टमध्ये सर्वात पहिलं गाणं आहे ते २९ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘संजू’ चित्रपटातील. ‘मैं बढिया तू बढिया’ या गाण्याला आतापर्यंत २.६ कोटी लोकांनी पाहिलं असून २ लाखपेक्षा अधिक लोकांनी लाईक केलं आहे. सोनू निगम आणि सुनिधी चौहाननं या गाण्याला आवाज दिला आहे.

- Advertisement -

दुसरं गाणंदेखील याच चित्रपटातील आहे. ‘कर हर मैदान फतह’ असं या गाण्याचं नाव असून हे गाणं सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. आतापर्यंत २.५ कोटी लोकांनी हे गाणं पाहिलं असून ३ लाखपेक्षा अधिक लोकांनी हे गाणं लाईक केलं आहे. या गाण्याला विक्रम मोंटराज यानं संगीत दिलं आहे.

- Advertisement -

पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार दिलजित दोसांजच्या ‘सूरमा’ चित्रपटातील ‘इश्क दी बाजिया’ हे स्वतः दिलजितनं म्हटलं असून १.१ कोटी लोकांनी हे गाणं पाहिलं आहे आणि १२२ हजार लाईक्स या गाण्याला मिळाले आहेत. सध्या हे गाणं ट्रेंडिंगमध्ये अकराव्या क्रमांकावर आहे.

तर एक दिवसापूर्वीच प्रदर्शित झालेलं ईशान खट्टर आणि जान्हवी कपूरच्या ‘धडक’चं टायटल ट्रॅक फारच कमी कालावधीत ट्रेंड झालं असून लवकरच पहिल्या क्रमांकावर हे गाणं येईल. या चित्रपटाला अजय – अतुल या मराठमोळ्या संगीतकार जोडीनं संगीत दिलं आहे. एका दिवसात हे गाणं ९० लाख लोकांनी पाहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -