जब मिल बैठे दो यार! फौजी मित्रांची अखेर 3 वर्षांनंतर भेट; व्हिडीओ पाहून सर्वच भावूक

trending watch viral video of two soldier reunited after three years
जब मिल बैठे दो यार! फौजी मित्रांची अखेर 3 वर्षांनंतर भेट; व्हिडीओ पाहून सर्वच भावूक

लष्करी जवान भले कोणत्याही देशाचे का असेना परंतु या जवानांमधील मैत्री संपूर्ण जगाला माहीत आहे. देशाच्या रक्षणासाठी हे जवान कुटुंबापासून अनेक काळ दूर राहतात. मात्र यावेळी त्यांच्या बटालियनमधील मित्रांचाच मिळून ते एक कुटुंब तयार करतात. अगदी कुटुंबाप्रमाणे सर्व सण समारंभ साजरे करण्याबरोबर एकमेकांचे सुख, दु:ख वाटून घेत असतात. मात्र एकमेकांवर जीवाभावाप्रमाणे प्रेम करणारे दोन लष्करी जवान मित्र अनेक वर्षांनी भेटतात, तेव्हा ही भेट कशी असू शकते याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. जो व्हिडिओ पाहून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. यातील दोनही जवान मित्र तब्बल तीन वर्षांनी एकमेकांना भेटलेत. ज्या आपुलकीने आणि प्रेमाने हे जवान एकमेकांना भेटले ते पाहून सर्वच भावूक होत आहेत.

दोघांनीही आनंदात मारल्या उड्या

एका युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, निळा शर्ट घातलेला एक व्यक्ती मागून येतो आणि मित्राच्या खांद्यावर हात ठेवतो. हा त्याचा लष्करात काम करणारा मित्र आहे हे पाहताच तो आनंदाने उड्या मारण्यास सुरुवात करतो. दोघे एकमेकांना अगदी कडकडून मिठी मारतात आणि भेटीचा आनंद साजरा करतात. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dance Videos Daily (@dancinghome)

३ वर्षानंतर झाली भेट

न्यूजवीकच्या बातमीनुसार, जॉन टेलरची पत्नी रिकेल टेलरने हे सरप्राईज आयोजित केले होते. जॉन आणि त्याचा मित्र जस्टिन क्रॉकेट हे दोघेही जपानमध्ये तीन वर्षे नोकरी करत होते. तीन वर्षांनंतर दोघे फ्लोरिडामध्ये अशा प्रकारे एकमेकांना भेटले. जेव्हा लोकांनी त्यांच्या भेटीचा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना खूप आनंद झालाच पण भावूकही व्हायला झाले. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी सुंदर कमेंट्स केल्या आहेत.


झूम कॉलवर 900 जणांना नोकरीवरून काढणारे सीईओ विशाल गर्ग पुन्हा सेवेत परतले