घरट्रेंडिंगऐतिहासिक उल्हासनगर शहराचा ७० वा वर्धापनदिन

ऐतिहासिक उल्हासनगर शहराचा ७० वा वर्धापनदिन

Subscribe

जाणून घ्या उल्हासनगर शहराबद्दल...

मुंबईच्या अगदी जवळ असलेलं उल्हासनगर हे शहर सर्वांना परिचित आहेच. मुंबईत दोन व्यक्ती एखादी वस्तू कुठून घेतली यावर वाद घालत असले तर “मेड इन युएस” हा शब्द हमखास ऐकायला मिळतो. उल्हासनगरमधील औद्योगिक उत्पादनामुळे महाराष्ट्राचे युएस अशी उल्हासनगरला ओळख मिळाली आहे. या शहराचा स्वतःचा असा वेगळा इतिहास आहे. ८ ऑगस्ट १९४९ रोजी या शहराची स्थापना झाली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन गर्व्हनर सी. गोपालाचारी यांनी निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी उल्हासनगर शहर वसवले होते. यावर्षी उल्हासनगर आपला ७० वा वर्धापनदिन साजरा करत आहे.

उल्हासनगर पालिकेच्या मुख्यालयामागे शहर स्थापनेची कोनशिला आजही डौलाने उभी आहे. राज्यपाल सी. गोपालाचारी यांनीच या कोनशिलेचे उदघाटन केले होते. भारत – पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर सिंधी समाजाचे अनेक लोक निर्वासित म्हणून भारतात आले होते. त्यांच्यासाठी हे शहर वसवण्यात आले.

- Advertisement -

उल्हासनगरची संक्षिप्त माहिती…

१) द्वितीय महायुद्ध (१९४५) च्या दरम्यान ब्रिटिश सरकारने कल्याणच्या बाजूला असलेल्या १३ स्क्वेअर किलोमीटरच्या निर्जन ठिकाणी कल्याण मिलिटरी ट्रान्झिट कॅम्पची स्थापना केली. (नेताजी हायस्कूलच्या लायब्ररीत कल्याण कॅम्प असा स्टॅम्प मारलेली पुस्तकं होती)

२) कल्याण कॅम्पमध्ये सैनिकांची राहण्याची सोय होती. इथून सैनिकांना आसामच्या युद्धभूमीवर पाठविले जाई.

- Advertisement -

३) कल्याण कॅम्प हे एक ते पाच कॅम्पमध्ये विभागले होते. तसेच, ए, बी आणि सी असे तीन प्रकारचे ब्लॉक आणि चाळी सदृश्य बॅरेक हे सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी निवस्थानं होती.

४) O.T. सेक्शन अर्थातच ऑफिसर्स टेनंट् हे पाचही कॅम्प मध्ये निर्माण केले होते.

५) सैनिकांसाठी GEM’s siding (आताच विठ्ठलवाडी) हे एकमेव स्टेशन होतं. Garrison Engineering (G.E.M.) इथे सैनिकांसाठी रसद पुरवठा होत असे.

६) द्वितीय महायुद्ध संपल्यावर कल्याण कॅम्प देखील निर्मनुष्य झालं. अखंड भारताची फाळणी झाल्यावर, पाकिस्तान मधील निर्वासित भारतात आसरा घेऊ लागले. भारतात कल्याण कॅम्प हे अशा निर्वासितांना राहण्याच्या ठिकाणांपैकी एक होत.

७) निर्वासित सिंधी लोकांची भारतातील सर्वात मोठी वस्ती उल्हासनगरमध्ये आहे.

८) कराचीतील निर्वासित कोकणस्थ मराठी बांधव हे मराठा सेक्शन इथे वसले. सिंध मधील निर्वासित गुजराती तसेच गोमंतक समाज देखील उल्हासनगरमध्ये स्थायिक झाले.

९) भारतीय असलेले प्रथम आणि शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या हस्ते ८ ऑगस्ट १९४९ रोजी उल्हासनगर टाउनशिपची कोनशिला बसविण्यात आली. ही कोनशिला महापालिका कार्यालया मागील स्विमिंग पुल जवळ आहे.

१०) माजी बँक मॅनेजर रघुनाथ विश्राम राणे हे चीफ ट्रान्झिट कमांडर म्हणून उल्हासनगरची प्रशासकीय देखरेख करीत.

११) अंबरनाथ आणि विठ्ठलवाडी दरम्यान रेल प्रवासी एका विशिष्ट ठिकाणी चैन खेचून लोकल थांबवायचे. त्याच ठिकाणी १९५६ रोजी उल्हासनगर रेल्वे स्टेशन अस्तित्वात आलं.

१२) उल्हासनगरला तीन स्टेशन आहेत – उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि शहाड

१३) या शहरात पाच पिनकोड आणि पाच पोस्ट ऑफिस आहेत – ४२१००१, ४२१००२, ४२१००३, ४२१००४ आणि ४२१००५

१४) इथे चार पोलिस स्टेशन, एक शहर वाहतूक पोलिस स्टेशन आणि पोलिस उपायुक्त कार्यालय आहे.

१५) उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, महापालिका आणि कोर्ट आहे.

१६) येथील जीन्स आणि फर्निचर मार्केट हे देशातील मोठ्या मार्केट पैकी आहेत. नव्वदच्या दशकात दुबईतील ९० टक्के एम्ब्रोईडरी ही उल्हासनगरमध्ये केली जात असे.

१७) शहरात नऊ सिनेमागृह आहेत – प्रभात (बंद), विनस, अनिल, अशोक, पॅरामाऊंट, जवाहर, सपना, अमान आणि श्रीराम

१८) उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक इथे बिर्ला कंपनीने बांधलेल्या बिर्ला मंदिर आणि बाहेरील परिसरात तेरे नाम या सिनेमाचं चित्रीकरण झालं आहे.

१९) शहरात दोन विधानसभा आमदार आहेत.

२०) शिवसेनेचा प्रसिद्ध वाघ, या शहरातील बाबा गुर्जर यांनीच रेखाटला.

२१) भारतातील सर्वात श्रीमंत दलित महिला पद्मश्री कल्पना सरोज या उल्हासनगरच्या रहिवासी.

२२) देशातील टॉप टेन photojournalist पैकी एक असलेले पद्मश्री सुधारक ओलवे हे देखील उल्हासनगरचे.

२३) शहरातील डॉ. दयाल आशा हे सिंधी साहित्यातील पहिले D.Lit पदवीचे मानकरी आहेत.

२४) महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ व देशातील प्रमुख दहा बौद्ध भिख्खू पैकी असलेले (श्रीलंकन) महास्थविर आनंद भंते हे पन्नास वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहेत.

२५) शहरातील अंध असलेल्या प्रांजल पाटील, IAS अधिकारी, केरळात कार्यरत आहेत.

२६) उल्हासनगर हे राज्यातील शंभर टक्के शहरीकरण झालेल्या चार शहरांपैकी एक आहे. (मुंबई, पुणे व ठाणे हे इतर तीन शहरं)

(माहिती संकलन – अजित वाकोडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -