घरट्रेंडिंगकमरेखाली हात लावून महिलांना आशिर्वाद देणारा बाबा

कमरेखाली हात लावून महिलांना आशिर्वाद देणारा बाबा

Subscribe

एक ढोंगी बाबा महिलेच्या कमरेखाली हात लावून महिलांना आशिर्वाद देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भक्तांसमोरच महिलांना अश्लिलपणे स्पर्श करणाऱ्या या ढोंगी बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

भोंदू बाबांच्या प्रलोभनांना आणि अंधश्रद्धेला बळी पडून महिलांचे शोषण होण्याच्या घटना नेहमी घडत असतात. यापूर्वी देखील अनेक भोंदू बाबांना बलात्काराच्या गुन्ह्याखाली पकडण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वीच आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ती म्हणजे एक ढोंगी बाबा महिलेच्या कंरेखाली हात लावून महिलांना आशिर्वाद देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भक्तांसमोरच महिलांना अश्लिलपणे स्पर्श करणाऱ्या या ढोंगी बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

काय आहे या व्हिडिओत

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा ढोंगीबाबा महिलेसोबत अश्लिल कृत्य करत आहे. हा भोंदूबाबा एका महिलेला आशिर्वाद घेण्यास सांगत आहे. आशिर्वाद दिल्यानंतर हा भोंदूबाबा त्या ठिकाणी येणाऱ्या महिलांच्या कमरेखाली हात लावून त्यांना आशिर्वाद देत आहे. असा आशिर्वाद देत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने त्या कृत्याचे मोबाईलवर व्हिडिओ शूट केले असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. अनेकांनी या ढोंगी बाबाच्या वागण्यावर संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांनी या ढोंगी बाबाच्या या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. मात्र हा ढोंगी बाबा कोण आहे? त्याचे नाव काय आहे? तसेच हा व्हिडिओ कुठचा आहे? यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

- Advertisement -


वाचा – आश्रम ते तुरुंग… भारतातील भोंदूबाबांचा रंजक प्रवास!

- Advertisement -

वाचा – बेपत्ता नवऱ्याला शोधतो सांगून फकिरानं महिलेला गंडवलं!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -