घरट्रेंडिंगWCR Recruitment 2021: पदवीधर आहात? रेल्वेत 'या' पदांसाठी भरती; दरमहा ६१ हजारापर्यंत...

WCR Recruitment 2021: पदवीधर आहात? रेल्वेत ‘या’ पदांसाठी भरती; दरमहा ६१ हजारापर्यंत मिळणार पगार

Subscribe

पश्चिम मध्य रेल्वेने स्टेशन मास्टर या पदावर भरती काढली असून ही पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एकूण ३८ पदांची भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी डब्ल्यूसीआर https://wcr.indianrailways.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. उमेदवारांना आपले ऑनलाईन अर्ज २५ जुलै २०२१ पर्यंत करता येणार आहे. २५ जुलै ही अंतिम तारीख असून यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. डब्ल्यूसीआरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोणताही पदवीधर उमेदवार स्टेशन मास्टर पदासाठी अर्ज करू शकतो. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतो.

पश्चिम मध्य रेल्वेने स्टेशन मास्टर या पदासाठी २५ जून रोजी अधिसूचना जारी केली असून उमेदवार २५ जुलै पर्यंत अर्ज करून शकणार आहेत. स्टेशन मास्टर पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे वय ४० वर्षे असणे आवश्यक आहे. यामध्ये अनुसूचित जाती / जमाती उमेदवारांसाठी वय ४५ वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी ४३ वर्षे असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

अशी होणार उमेदवाराची निवड

स्टेशन मास्टर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षा प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यानुसार सेलेक्शन कंप्यूटर आधारित टेस्ट (सीबीटी) आणि एप्टीट्यूड टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन / मेडिकल परीक्षा असणार आहे. वर उल्लेख केलेल्या भरती टप्प्यांच्या आधारे निवड योग्यतेनुसार काटेकोरपणे केली जाणार आहे.

असा असणार पगार

या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा ६१ हजार ४०० देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन पाहता येणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -