घरट्रेंडिंगपतीला अद्दल घडवण्यासाठी पत्नीने लिहीला बिछाण्याच्या गादीवर संदेश

पतीला अद्दल घडवण्यासाठी पत्नीने लिहीला बिछाण्याच्या गादीवर संदेश

Subscribe

नवऱ्याचे एका भलत्याच स्री सोबत अनैतिक संबंध असल्याचे समजताच तिने पतीला धडा शिकवण्याचे ठरवले.

आजच्या विकसित तंत्रज्ञानाच्या युगात नात्यांतील गुंता मात्र मोठ्या प्रमाणत वाढलेला दिसतो आहे. नात्यांमधील दुरावा, वादविवाद तसेच अनैतिक संबंध यांसारख्या विविध कारणांमुळे पती-पत्नीमधील घटस्फोटाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेकदा जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर प्रत्येकाची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते कोण भांडण करतं, कोण रडतं तर काही लोक आपल्या जोडीदाराला दोष देत असतात. अशाच प्रकारे एका महिलेने आपल्या पतीला धडा शिकवण्यासाठी चक्क बिछाण्याच्या गादीवर संदेश लिहून घटस्पोट दिला आहे.

एका महिलेने अशाच प्रकारे आपल्या पतीला धडा शिकवला आहे. त्याच झालं असं की, आपल्या नवऱ्याचे एका भलत्याच स्री सोबत अनैतिक संबंध असल्याचे समजताच तिने पतीला धडा शिकवण्याचे ठरवले, त्याचा हा प्रताप सर्वांसमोर आला पाहीजे यासाठी तिने बिछाण्याच्या गादीवर रंगाने ठळक अक्षरात पतीसाठी संदेश लिहला आणि गादी घराबाहेर ठेवली.

- Advertisement -

काय लिहीले होते संदेशात?

आपल्या पतीचे एका दुसऱ्या स्री सोबत संबंध असल्याचे समजताच तिने पतीला अद्दल घडवण्यासाठी बिछाण्याच्या गादीवर संदेश लिहीला, ‘मी आपल्या घराचे टाळे बदलले आहेत. हा बिछाणा त्या मुलीच्या घरी घेऊन जा आणि मी तुला घटस्पोट देत आहे. या तुझ्या सर्व वाईट गोष्टींची कल्पना मी मुलांना सुद्धा दिली आहे आणि आता ते आपल्या वडीलांवर प्रेम करत नाहीत’. अशा प्रकारचा संदेश तिने आपल्या पतीसाठी गादीवर लिहला आहे. याचा फोटो महिलेने ‘रेडडिट डॉट कॉम’ वर शेअर केला आहे. या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, अनेकांनी महिलेचा हा निर्णय कठोर असल्याचे सांगितले तर काहींनी या प्रकरणात मुलांना सहभागी करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -