वारंवार छेड काढणाऱ्या सावत्र बापाचा खून

murder of a young man
प्रातिनिधीक फोटो

नाशिकरोड येथील गोरेवाडीतील खंडू गायकवाड मळ्यात राहणाऱ्या सावत्र बापाचा खून केल्याची घटना आज (दि.14) रात्री घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसांना माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी दाखल झाले आहेता.  सुभाष बोराडे असे मृताचे नाव आहे.

करोनाच्या भितीने मुंबईतून आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन महिला नाशिकरोड येथील सावत्र बाप बोराडे याच्याकडे राहायला आली. तो महिलेची वारंवार छेड काढत होता.  त्याने आज (दि.१४) रात्रीही पुन्हा एकदा महिलेची छेड काढली असताना महिलेने प्रतिकार करताना सावत्र बापाच्या गुप्तांगावर लाथा मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.