महिला प्रांत अधिकार्‍याच्या अपहरणाचा प्रयत्न

निफाडच्या महिला प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना गुरूवारी (दि.२) रात्री आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येण्याची शक्यता पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.