घरमुंबईअंबरनाथ विधानसभेत शिवसेनेचे डॉ. किणीकर यांचा विजय

अंबरनाथ विधानसभेत शिवसेनेचे डॉ. किणीकर यांचा विजय

Subscribe

शिवसेनेचे डॉ. किणीकर यांचा विजय

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांचा २८ हजार ९१० मतांनी दणदणीत पराभव केला आहे. किणीकर यांनी सतत तीन वेळा निवडणूक जिंकून आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. आज महात्मा गांधी महाविद्यालयात सकाळपासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या ४ फेरीत शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर, काँग्रेसचे रोहित साळवे आणि वंचित बहुजन आघाडीचे धनंजय सुर्वे यांच्यात चुरशीची लढत होती. मात्र, ५ व्या फेरीपासून शेवटच्या २२ व्या फेरीपर्यंत  डॉ. बालाजी किणीकर यांनी आघाडी कायम ठेवत अंतिम निकालात रोहित साळवे यांचा दणदणीत पराभव केला.

यात काँग्रेस आघाडीची मते वाया गेली

शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांना एकूण ५९ हजार ३२९ मते मिळाली असून काँग्रेसचे रोहित साळवे यांना ३० हजार ४१९ मत मिळाली असून वंचित बहुजन आघाडीचे धनंजय सुर्वे यांना १६ हजार ९२ मते मिळाली आहेत. तर मनसे उमेदवार सुमेध भवार यांना १३ हजार ५१९ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे या मुख्य उमेदवानंतर सर्वात जास्त मते ही नोटाला मिळाली असून या मतांची एकूण संख्या ४ हजार २६९ एवढी मते आहेत. तर काँग्रेस – राष्ट्रवादी यांची आघाडी कायम असून देखील काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे हे उमेदवार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण खरात यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही. मात्र, त्यांनी रोहित साळवे यांना समर्थन दिले असून या सावळ्या – गोंधळात प्रवीण खरात यांनी ३ हजार २९२ मते घेऊन काँग्रेस आघाडीची मते वाया घालवली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – नवी मुंबईत भाजपने गड केला काबिज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -