घरमुंबईसंपत्तीच नाही म्हणणारे पडळवकर एक कोटींचे मालक

संपत्तीच नाही म्हणणारे पडळवकर एक कोटींचे मालक

Subscribe

सांगली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित आघाडी सोडली असून ते भाजपत सहभागी झाली आहेत. त्यांना भाजपने बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. अर्थात त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार यांचे आव्हान आहे. मी पूर्णवेळ कार्यकर्ता आहे, माझ्यावर कार्यकर्तेच प्रेम करतात, मला कार्यकर्तेच निवडणुकांसाठी पैसा पुरवतात. मी फाटकाच आहे, मला 1 दोन लाख रुपयांचे कर्ज आहे, असेही पडळकर जाहीरपणे सांगितले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण असलेले शपथपत्रही जोडले आहे. या शपथपत्रात त्यांच्या एकूण संपत्तीचा लेखोजोखा मांडण्यात आला आहे. त्यानुसार पडळकर यांच्याकडे जवळपास एक कोटी रुपयांची संपत्ती आहे. आपल्या 13 पानी शपथपत्रात पडळकर यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे. त्यानुसार, पडळकर यांच्याकडे रोख स्वरुपात 95 हजार रुपयांची रक्कम आहे.

- Advertisement -

पडळकर यांची एकूण जंगम मालमत्ता 26 लाख 682 रुपये एवढी आहे. त्यामध्ये 24 लाख रुपयांच्या फॉर्च्युनर गाडीचा समावेश आहे. तसेच, 20 ग्रॅम सोने, रोख रक्कम, आणि बँकेतील ठेवींचाही समावेश आहे. स्थावर मालमत्ता पडळकर यांची स्थावर मालमत्ता 50 लाखांच्यावर आहे. आटपाडीतील पिंपरी या गावी त्यांची वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे. तसेच इतर जागा आणि जमीन मिळून स्थावर मालमत्ता 73 लाख रुपयांची आहे. त्यामध्ये 2013 साली गोपीचंद यांनी खरे 6994 चौरसफूट जागा खेरदी केली असून त्याचे सध्या बाजारमूल्य 28 लाख रुपये आहे. पडळकर यांची स्थावर आणि जंगम अशी एकूण संपत्ती 99 लाख 682 रुपये एवढी आहे. त्यामुळे स्वत:ला नेहमीच माझे सगळे उघडे आहे. माझ्याजवळ पैसाच नाही, असे म्हणणारे पडळकर जवळपास करोडपती आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -