घरमहाराष्ट्रमाझ्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न झाला -उदयनराजे भोसले

माझ्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न झाला -उदयनराजे भोसले

Subscribe

सातार्‍यातून भाजपच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवणारे उदयनराजे भोसले आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका होत असताना उदयनराजेंनी त्या टीकेला चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप उदयनराजे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान उदयनराजेंवर टीका केली होती. आम्ही त्यांच्यासाठी छातीचा कोट केला होता, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले होते. त्याला उदयनराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छातीचा कोट केला होता की, कोटाची छाती केली हा मोठा प्रश्न आहे, असे म्हणत उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांनी त्या टीकेचा समाचार घेतला होता.

- Advertisement -

राजकारण-समाजकारण सोडा पण जेव्हा आमचा वाढदिवसाचा सर्वपक्षीय कार्यक्रम असतानाही ज्यांनी कट करुन, आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट सामान्य जिल्हावासियांनी मात्र जोरदार हाणून पाडला होता, असा आरोप उदयनराजे यांनी केला आहे.

जिल्हावासियांनी केलेल्या छातीच्या कोटाचे त्यांना निश्चित आश्चर्य वाटणारच. छातीचा कोट केला म्हणणार्‍यांचा आता जनतेकडून कडेलोट होणार असल्याची कुणकुण लागली आहे. त्यांना कशाचे आश्चर्य वाटले सांगितले पण संगनमताने केलेल्या कटकारस्थानांचे आश्चर्य ते सांगायला विसरले असावेत, असे उदयनराजे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -