घरमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ५१ उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले आहेत. या यादीत जुन्या नावांनाच अधिक पसंती देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. तर प्रणिती शिंदे यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची जागा वाटपासंदर्भात मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर आज संध्याकाळी काँग्रेसचे केंद्रीय सचिव मुकुल वासनिक यांनी ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.


हेही वाचा – चर्चा पूर्ण झाल्याशिवाय आघाडीची घोषणा होणार नाही – जयंत पाटील

- Advertisement -

 

काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्याची तारीख दोनदा पुढे ढकलली

काँग्रेस २० सप्टेंबरला आपली पहिली यादी जाहीर करणार असल्याची चर्चा होती. मात्र, काही कारणास्तव काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर होऊ शकली नाही. त्यानंतर २१ सप्टेंबरला निवडणुकीची तारीख जाहीर झाली. निवडणूक जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करणार होती. मात्र, तरीदेखील पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर झाली नाही. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडी संदर्भात अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. आघाडीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या अनेक बैठका दोन्ही पक्षांमध्ये संपन्न झाल्या. रविवारी देखील अशीच एक बैठक पार पडली. ही बैठक राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. त्या बैठकीनंतर अखेर संध्याकाळी काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर झाली. या बैठकीत अजूनही ८ ते १० जागांचा तिढा सूटलेला नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या जागांचा तिढा सूटत नाही, तोपर्यंत आघाडीची घोषणा होणार नाही.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -