घरदेश-विदेश'महाराष्ट्रा'च्या सत्तापेचात सोनिया गांधीही उतरल्या रस्त्यावर

‘महाराष्ट्रा’च्या सत्तापेचात सोनिया गांधीही उतरल्या रस्त्यावर

Subscribe

'अब ती बार, बेईमानो की सरकार!', असे म्हणत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी देखील आता रस्त्यावर उतरल्या आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे पडसाद आज लोकसभेतही उमटलेले पाहायला मिळाले. लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मोदी सरकारविरोधात घो,णाबाजी करण्यास सुरुवात केली. ‘अब ती बार, बेईमानो की सरकार!’, असे म्हणत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी देखील रस्त्यावर उतरल्या. ‘मोदी सरकार हाय – हाय’ आणि ‘लोकाशाहीची हत्या करणे बंद करा’, अशी घोषणाबाजी देखील काही खासदारांनी केली. यावेळी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही देशात लोकशाहीची हत्या झाली आहे, असे म्हणत महाराष्ट्र सरकारच्या मुद्द्यावरून संसदेच्या आवारात निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisement -

आमदार पुन्हा एकदा स्वगृही परतले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणतीही कल्पना न देता अजित पवार यांनी परस्पर भाजप आणि पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेत बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्याने राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी पुढे सरसावले. त्यानंतर काही आमदार पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर, भाजप बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष एकीकडे कोर्टात पोहोचला असतानाच, दुसरीकडे त्याचे पडसाद लोकसभेतही उमटताना पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज सुरू होताच आज विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी देण्यास सुरूवात केली.

- Advertisement -


हेही वाचा – ‘२६/११’च्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -