घरमहाराष्ट्रफॉर्म्युल्यावर सहमती झाल्यानंतरच काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंब्यावर निर्णय होणार!

फॉर्म्युल्यावर सहमती झाल्यानंतरच काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंब्यावर निर्णय होणार!

Subscribe

शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र न आल्यामुळे शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रण दिलं. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींची वाय. बी. सेंटरला संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी दोन्ही पक्षांनी सत्तास्थापनेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ‘शिवसेनेने पहिल्यांदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत संपर्क ११ तारखेला म्हणजेच सोमवारी केला होता. इतक्या महत्त्वपूर्ण निर्णयाआधी सर्व मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी होती. यासंदर्भात दोन्ही पक्षांकडून सर्व मुद्द्यांवर व्यापक सहमती होण्यासाठी चर्चा केली जाईल’, अशी पक्षाची भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी या पत्रकार परिषदेत मांडली.

‘शिवसेनेने कालच अधिकृतरित्या संपर्क साधला’

राष्ट्रवादी काँग्रेलसा मंगळवारी संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र, त्याआधीच दुपारी १२ वाजता राष्ट्रवादीने मुदत वाढवून देण्याचं पत्र राज्यपालांना पाठवलं. मात्र, त्याला नकार देत राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली. त्यानुसार संध्याकाळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक वाय. बी. सेटरवर बैठक झाली. या बैठकीमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? यावर चर्चा झाली. मात्र, ‘अजूनही दोन्ही पक्षांकडे काही मुद्द्यांवर शिवसेनेसोबत सहमती होणं आवश्यक असल्यामुळे ती सहमती झाल्यानंतरच शिवसेनेला पाठिंब्याबाबत निर्णय घेतला जाईल’, असं या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, ‘शिवसेनेने सोमवारीच आमच्याशी अधिकृतपणे पाठिंब्यासाठी संपर्क साधला’, असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं.

तिनही पक्षांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर आधारीत आघाडी होईल? कोणत्या पदांवर सहमती होईल? सत्तेचं वाटप कशा पद्धतीने असेल? एकूणच ज्या फॉर्म्युल्यानुसार सत्तास्थापना होणार, त्यातील सर्व मुद्द्यांवर जोपर्यंत एकमत होत नाही, त्याशिवाय या शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत पुढे जाणं अवघड आहे.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


हेही वाचा – ‘…तर शिवसेनेचं स्वागतच’, भाजपची नवी खेळी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -