घरमुंबईकल्याणात बंडोबांना थंड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

कल्याणात बंडोबांना थंड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

Subscribe

सुभाष भोईरांचे बंड शांत होणार ?

कल्याण डोंबिवली शहरात शिवसेना व भाजपमध्ये मोठया प्रमाणात बंडखोरी उफाळून आल्याने बंडखोरांना थंड करण्यासाठी दोन्ही पक्षातून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात इतर बंडखोरांना थंड करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शनिवारी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांना मातोश्रीवर बोलावून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाराजी दूर करीत समज देण्यात आली आहे. त्यामुळे भोईरांचे बंड शांत होणार असल्याचे दिसून येत आहे.

कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र या ठिकाणी भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करून बंडखोरी केली आहे. तसेच पवार यांच्याकडे भाजपचे प्रदेश सचिव पद आहे, त्यामुळे पवार हे माघार घेतील असे भाजपतील पदाधिकारी सांगत आहेत. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आणि काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत.

- Advertisement -

पक्षाने दोघांनाही एबी फॉर्म दिला आहे. कुणाची उमेदवारी ग्राहय धरायची आणि कोणी माघार घ्यायची? असा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारी दोघांपैकी कोण माघार घेणार कि मैत्रीपूर्ण लढत होणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कल्याण पूर्वेतून भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र उल्हासनगरमधील सेनेचे पदाधिकारी धनंजय बोडारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली आहे. त्यामुळे गायकवाड यांच्यापुढं मोठं आव्हान आहे. तसेच या मतदार संघात राष्ट्रवादीकडून प्रकाश तरे यांनी अर्ज भरला आहे. मात्र काँगेसचे शैलेश तिवारी यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे युतीत आणि आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येतय.

बंडखोरांना थंड करण्यासाठी पक्षस्तरावर बैठका सुरू आहेत. कल्याण ग्रामीणमधून सेनेने सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. मात्र दोन दिवसानंतर रमेश म्हात्रे यांना एबी फॉर्म देत भोईर यांची उमेदवारी रदद केली होती. या नाटयमय घडामोडीमुळे भोईर नाराज झाले होते त्यांनी पक्ष कार्यालयात मंडपही टाकला होता मात्र शुक्रवारी हा मंडप आणि फलकही त्यांनी काढून टाकला आहे. शनिवारी भेाईरयांना मातोश्रीवर बोलावून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांची समज काढली आहे यावेळी सेनेचे नेते एकनाथ शिंदे सुभाष देसाई आदी उपस्थित होते. त्यामुळे सेनेतील बंड थंड झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे सोमवारी भोईर उमेदवारी अर्ज मागे घेतात का याकडे लक्ष वेधले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -