घरमुंबईमहाविकास आघाडीचं तर ठरलं, आता मंत्रीपदांसाठी चढाओढ!

महाविकास आघाडीचं तर ठरलं, आता मंत्रीपदांसाठी चढाओढ!

Subscribe

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा झाला असून आता सरकारमध्ये कुणाला किती मंत्रीपदं मिळणार? मंत्रीपदांवर कुणाची वर्णी लागणार? यावर खल सुरू झाला आहे.

गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय महानाट्याचा शेवटचा अंक सध्या राज्यात सुरू असून अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्यानंतर अखेर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीवर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. यासंदर्भात गुरुवारी सकाळी दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका झाल्यानंतर दुपारी पुन्हा शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकांमध्ये सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेनेला १५, राष्ट्रवादी काँग्रेसला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार असल्याचं निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. चार आमदारांमागे एक मंत्रीपद असाच फॉर्म्युला ठरल्याचं देखील बोललं जात आहे.

बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री?

दरम्यान, मंत्रिपदांच्या संख्येनंतर आता या मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? याचे देखील अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असताना काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार देखील ठरवल्याचं बोललं जात आहे. आधी या पदासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र, अचानक ऐनवेळी अशोक चव्हाणांचं नाव मागे पडून काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं नाव निश्चित झाल्याचं देखील सूत्रांचं म्हणणं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाविकासआघाडीचं ठरेना; राज्यपालांनीच करून टाकलं सत्ताधिकार वाटप!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी येण्याची शक्यता कमीच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांसाठी पक्षाकडून अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची नावं चर्चेत आली आहेत. तर पक्षातल्या एका गटाकडून मागण्यात आलेल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळे यांचं नाव सुचवलं जात आहे. दरम्यान, शिवसेनेकडून मात्र अदयाप कोणत्याही मंत्रीपदासाठीच्या संभाव्या नावांची चर्चा सुरू नाही. पक्षातलाच एक गट उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदी बसावेत या विचाराचा असला, तरी खुद्द उद्धव ठाकरे यासाठी कितपत तयार होतील, हा देखील चर्चेचा विषय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -