घरमुंबई...तर राज्यात वंचितचे सरकार येईल - प्रकाश आंबेडकर

…तर राज्यात वंचितचे सरकार येईल – प्रकाश आंबेडकर

Subscribe

यंदा ईव्हीएम हॅक न झाल्यास वंचितचे सरकार येईल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. यवतमाळ मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले प्रकाश आंबेडकर बोलत होते.

सध्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा धडाका सुरु आहे. ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका घेण्यावर राज्यातील विरोधी पक्षांनी कायम विरोध केला आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, “यापूर्वी लोकसभा निवडणुकीत व तत्पूर्वीही मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन हॅक झाल्या. परिणामी भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आले. पण यंदा ईव्हीएम हॅक न झाल्यास वंचितचे सरकार येईल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. यवतमाळ मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले प्रकाश आंबेडकर बोलत होते.

…तर लोकसभेत १२ जागा मिळाल्या असत्या

ते पुढे म्हणाले की, “ईव्हीएमद्वारे निवडणूक पार पडली नसती तर लोकसभेत आम्हाला १२ जागांवर विजय मिळवता आला असता. पण आपला व्यवसाय वाचवण्यासाठी हॅकर ईव्हीएम मशीन हॅक करणार नाही,” असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच भाजप देशात चुकीचे चित्र निर्माण करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

सरकारमुळे जनता त्रस्त

शासनाची तिजोरी रिकामी झाली आहे. त्यामुळे व्यापारी, कारखानदार, कामगार सर्वच घटक त्रस्त आहेत. कापसालासुद्धा चार हजार क्विंटल दर मिळत नाही. या सर्व बाबींमुळे जनता मात्र त्रासली आहे. आम्हीच खरे विरोधी पक्ष असल्याचे या निवडणुकीत पुढे येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

वंचित सत्तेवर आल्यास…

यावेळी जनतेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “राज्यात वंचितची सत्ता आल्यास लघू आणि मध्यम उद्योगांना उभारी देऊन कृषी उद्योग निर्माण करण्यात येतील. परिणामी रोजगार वाढेल. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, दुष्काळी भागात पाण्याची व्यवस्था करू, अशी आश्वासनं त्यांनी यावेळी जनतेला दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -