Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ६७५ नवे रुग्ण, ८ जणांचा मृत्यू!

Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ६७५ नवे रुग्ण, ८ जणांचा मृत्यू!

Related Story

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासांत ६७५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ५३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आता कोरोनाबाधित संख्या ३ लाख ४७१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार २१० जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ८० हजार ८५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासांत ६७५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख पार झाला आहे. १ जुलै २०२० रोजी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख झाला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२०ला मुंबईतील बाधितांचा आकडा २ लाख पार झाला. आता मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ४७५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ११ लाख २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात आज (बुधवारी) दिवसभरात २३८ पक्षांचा मृत्यू झाला असून नमुने तपासणी करता पाठवण्यात आली आहे. ८ जानेवारीपर्यंत २ हजार ९६ पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र यांनी दिली आहे.

- Advertisement -


रत्नागिरी खेडच्या दुर्गा फाईन केमिकल कंपनीला आग लागली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.


लोकल सुरू करण्यासंबंधी आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गेली अनेक महिने सर्व सामान्य लोकांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी लोकल  सुरू होणार का याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे.


१ लाख ३९ हजार लसीचे तीन कंटेनर पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटमधून मुंबईत दाखल झाले आहेत. हे परळच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येणार आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात होणार आहे.


 

- Advertisement -