घरCORONA UPDATECorona live update: उजळून निघाल्या साऱ्या दिशा; मोदींच्या आवाहनाला उंदड प्रतिसाद

Corona live update: उजळून निघाल्या साऱ्या दिशा; मोदींच्या आवाहनाला उंदड प्रतिसाद

Subscribe

जगभरात १२ लाख १ हजार ९६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून ६४ हजार ७२७ लोकांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आतापर्यंत २ लाख ४६ हजार ६३८ लोकांना कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे आज ठिक ९ वाजता ९ मिनिटे दिवे, मेणबत्ती पेटवल्या गेल्या. लोकांनी उस्फुर्तपणे आपल्या खिडक्यांमध्ये दिवे, मेणबत्त्या पेटवून कोरोनाविरोधात आपली एकजूट दाखवून दिली.

narendra modi light event

- Advertisement -

 

#Live: पंतप्रधान मोदींच्या दिपोत्सवाच्या आवाहनला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 5, 2020

- Advertisement -

 


शाळा आणि महाविद्याल पुन्हा सुरु करण्याबाबत १४ एप्रिल रोजी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

 


भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या देशभरात ३,४७४ कोरोना बाधित असून कालपासून एकूण ११ मृत्यू झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७९ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 



औरंगाबाद येथे कोरोना पोझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद येथे कोरोना पोझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मराठवाड्यातील हा पहिला बळी आहे.


गुजरातहून निघालेले ८ हजार मच्छिमार समुद्रात अडकले

कोरोनाच्या भीतीमुळे गुजरातहून येणाऱ्या पालघरच्या मच्छिमारांना गावात येण्यास विरोध केल्याने पालघर जिल्ह्यातील सुमारे ७ ते ८ हजार मच्छिमार समुद्रात अडकले आहेत.


रिअल इस्टेट क्षेत्रात घरखरेदीत ७८ टक्के घट!

मुंबई महानगर क्षेत्रात ‘कोविड- १९’ मुळे खूप मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. याचाच परिणाम म्हणजे घर खरेदी रद्द करणाऱ्यांमध्ये २०० टक्के वाढ झाली आहे. क्रेडई आणि एमसीएचआयने जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.


वांद्रे-कुर्ला परिसरातील नायट्रोजन ऑक्साइडच्या प्रमाणात कमालीची घट

मुंबई आणि मुंबई जवळच्या परिसरातील प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे नेहमी दिसून येते. परंतु , कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे प्रदूषणात कमालीची घट झाल्याचे चित्र दिसत आहे.


डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून क्वॉरंटाईन व्यक्ती पळाला

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून एक क्वॉरंटाईन व्यक्ती पळाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस तपास करीत आहेत.


जळगावमध्ये दोन कोरोना संशयितांचा मृत्यू

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असलेल्या दोन संशयितांचा रात्रीच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. या दोन्ही संशयितांचे रिपोर्ट आल्यानंतरच ते कोरोनाचे रुग्ण होते की नाही हे स्पष्ट होणार आहे, तरी एकावेळी दोन संशयितांचे मृत्यू झाल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्याने या दोन्ही तरुणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे.


पुण्यात २४ तासात आणखी दोन बळी

मुंबईपाठोपाठ आता पुण्यात देखील कोरोनाग्रस्तांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुण्यात कोरोनामुळे चोवीस तासात आणखी दोन बळी गेले आहेत. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर एका ४८ वर्षीय पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.


२४ तासांत दोघांचा मृत्यू
पुण्यात कोरोनाच्या बळींची संख्या ४ वर गेली असून २४ तासांत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कनिका कपूरचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह
बेबी डॉल गाण्यामुळे नावारुपास आलेली गायिका कनिका कपूर हीचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

लखनऊमधील छावणी परिसर ४८ तासांसाठी सील

 

लखनऊमधील छावणी परिसर ४८ तासांसाठी सील करण्यात आला आहे. तबलीकी मरकजमध्ये सहभागी झालेल्या १२ जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हे १२ जण सरदार बाजार परिसरात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.


जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसेंदिवस हा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत जगभरात १२ लाख १ हजार ९६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून ६४ हजार ७२७ लोकांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आतापर्यंत २ लाख ४६ हजार ६३८ लोकांना कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -