आता Corona Test करायची असेल तर आधार कार्ड असणार आवश्यक

दिल्ली हायकोर्टाचा आदेश

देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत जर कोणाला कोरोना चाचणी करून घ्यायची असेल तर त्यांना दिल्लीतील त्यांच्या पत्त्याचा पुरावा देण्यासाठी आधार कार्ड दाखवणं आवश्यक असणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने हा आदेश दिला असून आधार कार्ड व्यतिरिक्त कोरोना चाचणीसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अर्ज (आयसीएमआर) भरणे देखील आवश्यक असणार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने असे सांगितले की, कोविड -१९ साठी दिल्लीत स्वेच्छेने ही चाचणी करणाऱ्यांना वैद्यकीय कागदपत्रे अनिवार्य असणार नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाने खासगी तपासणी प्रयोगशाळांना स्वेच्छेने इच्छुक असलेल्या २ हजार लोकांची कोरोना तपासणी करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ७५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ४३ लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. तर २४ तासात १ हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल देशात कोरोनाबाधितांच्या यादीत भारताने ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासात आढळून आलेल्या रुग्णांची व मृतांची माहिती जाहीर केली. मंत्रालयानं दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या २४ तासात देशात ७५ हजार ८०९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या ४२ लाख ८० हजार ४२३ वर पोहोचली आहे.


भारतीय मुलांमध्ये आढळतोय Corona व्हायरसचा घातक सिंड्रोम; जाणून घ्या, लक्षणं