घरदेश-विदेशचिदंबरम यांना कोठडी द्या, ईडीची मागणी

चिदंबरम यांना कोठडी द्या, ईडीची मागणी

Subscribe

पी. चिदंबरम चौकशीमध्ये सहकार्य करत नसून त्यांच्या कोठडीची मागणी ईडीनं केली आहे. अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी न्यायालयामध्ये अर्ज केला आहे.

एअर सेल- मॅक्सिस मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, पी. चिदंबरम हे तपास कार्यात सहकार्य करत नसून त्यांच्या कोठडीची मागणी ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने केली आहे. एअर सेल- मॅक्सिस मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्ज केला होता. मात्र, चिदंबरम यांच्या जामीनाला ईडीनं सक्त विरोध केला आहे. चौकशीमध्ये ईडीकडून सहकार्य होत नसून उत्तर देताना टाळाटाळ होत असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे चिदंबरम यांना कोठडीत घेऊन चौकशी करावी लागेल, असे ईडीने म्हटलं आहे. चिदंबरम यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यावर निकाल देतील.

दरम्यान, चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांना १ नोव्हेंबरपर्यंत अटक करू नये. न्यायालयाने ८ ऑक्टोबरच्या अंतरिम आदेशात नमूद केले होते. चिदंबरम यांनी ३० मे रोजी अटक टाळण्यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यांची अटक ही अनेक वेळा टळलेली देखील आहे. पण, आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. २५ ऑक्टोबर रोजी चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर विदेशी गुतंवणुकदारांशी साटंलोटं केल्याचा आरोप आहे. यावेळी त्यांचा मुलगा कार्ती याच्यावर देखील लाच घेतल्याचा अारोप आहे. या साऱ्या प्रकरणामकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -