घरदेश-विदेशदोन खिलाडी एकत्र; अक्षयने घेतली मोदींची मुलाखत

दोन खिलाडी एकत्र; अक्षयने घेतली मोदींची मुलाखत

Subscribe

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. हा टीझर पाहून अक्षय आणि मोदींच्या चाहत्याने त्याचे खूप कौतुक होत आहेत. अक्षय कुमारने नुकताच पंतप्रधानांची दिल्ली येथील ७ लोक कल्याण मार्गावर मुलाखत घेतली. अक्षय कुमारने मोदींसोबत गैरराजकीय विषयांवर चर्चा केली आहे. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान आणि अक्षय यांच्यामध्ये अनेक प्रश्न-उत्तरे झाली. ही मुलाखत तब्बल एक तास चालली. पंतप्रधान मोदींच्या बालपणापासून ते त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबाबत अनेक प्रश्न अक्षयने विचारले आणि मोदींनी देखील त्याला अतिशय मनमोकळेपणाने उत्तरं दिली. ही मुलाखत आज प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

या मुलाखतीमध्ये अक्षयने पंतप्रधानांना प्रश्न केला की तुम्हाला आंबे खायला आवडते का? तर यावर मोदी जोरजोरात हसताना दिसत आहे. आंबे खायला मला खूप आवडते. त्याचसोबत झाडांवर पिकलेले आंबे खायला मला खूप आवडत असल्याचे मोदींनी सांगितले. या व्यतिरिक्त अक्षयने त्यांना विचारले जसे मला आईला कामात मदत करायला आवडते तसेच मोदींना कधी वाटत नाही का आई, भाऊ आणि नातेवाईकांसोबत रहावे? यावर मोदींनी उत्तर दिले की, मी आयुष्यातल्या अतिशय लहान वयामध्येच सर्व काही सोडले आहे. माझी आई मला विचारते की, तू का माझ्यासाठी वेळ वाया घालवतो. या दोन ते तीन प्रश्नांचा टीझर अक्षयने त्याच्या ट्विटरवर टाकला आहे. यावर अनकेांनी खूप चांगल्या कमेंट केल्या आहेत.

- Advertisement -

टीझर पाहिल्यानंतर पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकं पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे, अक्षय कुमारसोबतच लोकांनी मोदींचे देखील कौतुक केले आहे. यावर एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, दो खिलाडी एक साथ, अब विपक्ष की लगेगी वाट. यावर मोठ्याप्रमाणात मोदी समर्थकांनी कमेंट केल्या आहेत. तर अनेक जणांनी अक्षय आणि मोदीला आपला रियल हिरो असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसापासून असा अंदाज वर्तवला जात आहे की, अक्षय कुमार देखील राजकारणात उडी मारेल. मात्र आताच्या या मुलाखतीवरुन हे स्पष्ट झाले आहे की, अक्षय कुमारने फक्त मोदींची मुलाखत घेतली आहे. अक्षयने घेतलेली ही मुलाखत एएनआय या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -