घरCORONA UPDATEराहुल गांधी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पलटवार

राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पलटवार

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एएनआय वृत्तसंस्थेच्या वतीने देशातील सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रदिर्घ मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी कोरोना संकट, लडाख सीमेवरील भारत-चीन चकमक सारख्या विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी काँग्रेस नेते आणि विरोधक राहुल गांधी यांच्यावरही पलटवार करत संसदेत येऊन आमच्याशी चर्चा करू शकतात, असे आवाहन त्यांनी केले.

लडाखच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर अमित शहा यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, आम्ही चर्चा करण्यासाठी घाबरत नाही. राहुल गांधी केव्हाही संसदेत येऊन आमच्याशी चर्चा करू शकतात. मात्र, जवान सीमेवर लढत असताना पाकिस्तानला आनंद होईल, अशा प्रकारची वक्तव्ये करणे गैर आहे. राहुल गांधी यांनी भारत-चीन तणावाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा उल्लेख सरेंडर मोदी असा केला होता. यावर अमित शहा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमित शहा यांनी उत्तर दिले आहे.

- Advertisement -

अमित शहा म्हणाले की, संसदेचे सत्र व्हायला हवे. चर्चा करायची असेल तर या आपण चर्चा करू. कोणीही चर्चेला घाबरत नाही. १९६२ पासून ते आतापर्यंतच्या स्थितीवर दोन हात होऊन जाऊ द्या. मात्र देशाचे जवान सीमेवर संघर्ष करत असताना, सरकार एक भूमिका घेऊन ठोस पावले उचलत असताना अशा परिस्थितीत अशा प्रकारे पाकिस्तानला आनंद होईल, अशी वक्तव्ये करायला नको.

- Advertisement -

अमित शहा पुढे म्हणाले की, केंद्र सरकार भारत विरोधी प्रचाराविरुद्ध लढण्यासाठी सक्षम आहे, मात्र इतक्या मोठ्या पक्षाचा एक माजी अध्यक्ष अशा प्रकारचे क्षुद्र राजकारण करतो हे पाहून दु:ख होते.

हेही वाचा –

विनाकारण फिराल, तर वाहन जप्त होईल; मुंबई पोलिसांची नियमावली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -