घरताज्या घडामोडीअर्जुनाच्या बाणामध्ये आण्विक शक्ती होती - राज्यपाल

अर्जुनाच्या बाणामध्ये आण्विक शक्ती होती – राज्यपाल

Subscribe

भारत हा शक्तीशाली देश आहे. त्यामुळे जगाला भारताकडे दुर्लक्ष करणं परवडणार नसल्याचं धनकर म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांच्या हस्ते दक्षिण कोलकत्यामधील बिर्ला इंडस्ट्रीयल अँड टेक्नोलॉजिकल मुझियमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अजब असा दावा केला की, ‘आपल्याकडे रामायणाच्या काळात विमाने होती. याशिवाय महाभारतामध्ये अर्जुनाच्या बाणामध्ये आण्विक शक्ती होती, असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे धनकर यांना सोशल मीडियावर नेटकरी चांगलचं ट्रोल करत आहेत.

काय म्हणाले राज्यपाल धनकर?

भारताकडे अनेक शतकांपासून वैज्ञानिक ज्ञान असल्याचा दावा करत त्यांनी महाभारतामधील संदर्भ दिला. ते म्हणाले की, ‘१९१० किंवा १९११ च्या दरम्यान विमानांचा शोध लागला. जर तुम्ही आपल्या वेदांचा अभ्यास केला असेल तर आपल्याकडे रामायणाच्या काळात उडणाऱ्या वस्तू असे लक्षात येईल. संजयने संपूर्ण महाभारत टीव्हीवरून सांगितलं नाही. महाभारतामध्ये संजय कुरुक्षेत्रातील युद्धभूमीपासून लांब असूनही त्याने धृतराष्ट्राला युद्धाची सर्व माहिती दिली. कारण दिव्यदृष्टीसारखी शक्ती संजयकडे होती. याशिवाय महाभारतामध्ये अर्जुनाच्या बाणामध्ये आण्विक शक्ती होती.’ पुढे धनकर असं म्हणाले, ‘त्यावेळेस आपण इतके शक्तीशाली होतो. त्यामुळे जगाला भारताकडे दुर्लक्ष करणं परवडणार नाही.’

- Advertisement -

यापूर्वी भाजपाच्या नेत्यांनी अनेक शतकांपासून भारतीयांकडे पुष्कर विमान आणि आधुनिक तंत्रज्ञान असल्याचा दावा केला होता. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी महाभारताच्या काळात इंटरनेट असल्यामुळे संजयला ध्रृतराष्ट्रापर्यंत युद्धभूमीवर परिस्थिती सांगता आली.


हेही वाचा – खासदार नुसरत जहाँ यांचा बेडरुममधला रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -