खासदार नुसरत जहाँ यांचा बेडरुममधला रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

actor and tmc mp nurat jahan romatic video viral on social media
खासदार नुसरत जहाँ यांचा बेडरुममधला रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. त्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नुसरत या चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांचा पती निखिल जैनसोबतचा बेडरुममधील एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ खासदार नुसरत जहाँ यांच्या फॅनपेजवरून शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये नुसरत जहाँ यांनी आपल्या पतीसोबत ‘ता रा रम पम’ या हिंदी चित्रपटातील ‘हे शोना’ या गाण्यावर अॅक्ट करताना दिसत आहे. या व्हिडिओत दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहे. नुसरत जहाँ अशाप्रकारचे रोमँटिक व्हिडिओ आणि फोटो नेहमी शेअर करत असतात. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांचे रेड गाऊन मधील ग्लॅमरस फोटो देखील व्हायरल झाले होते. खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होत. निखिल जैनशी लग्न केल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं होत.

नुसरत यांनी हिंदू मुलांशी लग्न केल्यामुळे धर्मगुरुंनी त्यांच्या फतवा काढला होता. याशिवाय त्यांच्यावर सिंदूर लावून संसदेत गेल्यामुळे टीका देखील केली होती. या सर्वांवर नुसरत यांनी सडेतोड उत्तर दिलं होत. सध्या नुसरत या नवीन प्रोजेक्ट आणि संसदीय कामांत व्यग्र आहेत.


हेही वाचा – गंगुबाईच्या रूपातला आलियाचा लक्षवेधी लूक प्रदर्शित